त्वचा म्हणजे आरोग्याचा आरसाच होय. शरीर तंदुरुस्त तर त्वचा नितळ, नाहीतर त्वचा मरगळलेली व निस्तेज होईल शिवाय त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर पुरळ येणे, कुठे काळपट, कुठे गोरी दिसणे. सारखे खाजणे, ईन्फेक्शन्स होणे, आता पावसाळयात ज्याला आपण "फंगल ईन्फेक्शन” म्हणतो ते होणे, वारंवार होणे, ज्याला आयुर्वेदात कायमचे उत्तर नक्कीच सापडलय.
आयुर्वेदामध्ये त्वचेच्या सौदंर्यासाठी तसेच त्वचारोगासाठी औषधोपचार होतो. त्यामध्ये ञिदोषाच्या दुषित होण्यासोबतच त्वचा-मांस- रक्त लसिका मध्ये विकृति निर्माण होउन त्वचारोग होतात. हयामध्ये आहारामध्ये विरुध्दान्न सेवन करणे, द्रव व गुरु पदार्थाचे अतिसेवन नैसर्गिक वेगांचा अवरोध, शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तर पिरिअड सुरु असल्यावर टीचर्स सोडत नसल्याने नैसर्गिक वेग आवरल्यामुळे त्वचेचे काय ईतरही आजार होउ शकतात. लहान मुले, वर्कींग लेडीज, पुरूष हयांनाही हा ञास सहन करावा लागतो. कुठल्याही त्वचारोगाची सुरुवात होतांना अतिस्वेद किंवा अजिबात स्वेदप्रकृति न होणे, अधुनमधुन खाज येणे, त्वचा रुक्ष व कोरडी होणे. उडीद, मासे, तिळ, गुळ, पिष्ठान्न, दही, लवण रस आम्लरस हयांचे अत्याधिक सेवन, अर्जीण, उपवासानंतर अति भोजन हयाशिवाय फास्ट फुड, बेकरी फुडस् हयाचा नारा केलयावर त्वचा कशी हसणार? म्हणुनच वरील कारणांना टाळल्यास त्वचारोगाला सुट्टी मिळेल. हयाशिवाय रक्तज कृमी, जंतुसंसर्ग हयामुळे त्वचारोग होतात. कुष्ठरोगाचे18 प्रकार असुन त्यावर प्रकारानुसार चिकित्सा केल्या जाते. तेव्हा आरोग्य उत्तम राखायचे म्हणजे काय करायला हवे वरील कारणे टाळुन आहार योग्य घेतल्यास बरेच त्वचारोग टाळता येउ शकतात.
हयाशिवाय जुनाट त्वचारोगाला आयुर्वेद हेच उत्तर आहे. तेव्हा काळवंडलेल्या त्वचेपासुन, ते सोरायसिस, एक्झीमा, पांढरे डाग(कोड) पर्यंतचा हा त्वचारोगावरील शोध आयुर्वेद चिकित्सेवरच येउन संपतो. त्यासाठी रक्तदृष्टी, ञिदोष प्रकोप टाळुन दिनचर्या त्याप्रमाणे ठरवुन वागावे. कोडासारखा असाध्य आजार काही ऍलर्जीमुळे उत्तपन्न होणारे त्वचारोग, शितपित्त हयावर योग्य आहार, मार्गदर्शन व औषधाने उपचार होउ शकतात. तेव्हा त्वचा सांभाळा म्हणजेच आरोग्य सांभाळा व तात्पुरते उपचार न करता कायमस्वरुपी निरोगी त्वचेचे धनी होण्यास आयुर्वेद तुम्हाला नक्कीच मदत करेल. काय मग हसणारी त्वचा हवी की रडणारी?
Comments
Post a Comment