कोड का वाढतोय ????
कोड का वाढतोय ????
गेल्या २० वर्षांपासून उपचार करतांना असे दिसून येते की, कोडाचे प्रमाण वाढतच चालले आहे. कोड वाढणे हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. यासाठी सुप्रसिद्ध आयुर्वेद, त्वचारोग व सौंदर्यतज्ज्ञ डॉ.सौ.नेहा डोणगावकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
प्रश्न - डॉक्टर, गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतो एखादा दुसरा कोडाचा पेशंट गावात असे. आता याचे प्रमाण फार वाढलेले दिसून येते.
उत्तर- अगदी बरोबर, हल्ली लहान मुले, तरुण, वयस्कर लोक सर्वांमध्ये कोड दिसून यायला सुरुवात झाली आहे. याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे :
१) आहार - आपल्या शरीराला पोषक द्रव्ये मिळण्यासाठी सकस व उत्तम आहार मिळणे आवश्यक आहे. आपल्यापैकी किती लोक आहार घेतांना याचा विचार करतात हा एक चिंतेचा विषय आहे. जीवनशैली, फास्ट लाईफ यामुळे खाण्यापिण्याला वेळ कमी दिला जातो. शिवाय घराचे अन्न प्रत्येकालाच शक्य होत नाही व त्यासाठी वेळही मिळत नाही. तर हॉटेलचे अन्न, जंक फूड्स, वडापाव, इडली, डोसा यासारखे पदार्थ, चायनीज अजिनोमोटो यामुळे त्वचेचे विकार खूपच वाढत चालले आहे.
या आहारातील दोषांमुळे रसधातू दूषित होतो. त्यामुळे रक्तधातू मध्ये दोष निर्माण होऊन हळूहळू त्रिदोषज विकार होऊ लागतात. कोड हा स्वयंपेशींचा नाश करणारा आजार आहे. यावर आता अनेक उपचार उपलब्ध झाले आहेत.
२) इतर आजार - चाळिशी नंतर स्त्री व पुरुषांमध्ये दिसणारे कोड हे त्यांच्या घरातील कोणाला तरी कोड, किंवा त्यांना स्वतःला डायबेटीस, थायरॉईड, अनिमिया, खूप दिवसांचा अमिबियोसिस, पोटाचे आजार, अचानक झालेला मोठा आजार अशी प्रमुख कारणे असतात. जितके वय जास्त तितका बरा होण्याचा कालावधी जास्त कारण वय वाढल्यानंतर यकृताची कार्यक्षमता कमी झालेली असते
काही रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब, मधुमेहामुळे किडनीवर होत असलेला दुष्परिणाम अशी बरीच अवयवांची गुंतागुंत दिसून येते. त्यामुळे त्वचारोग बरा व्हायला वेळ लागतो. कोडाचा मोठा डाग हळू-हळू छोटा होतो. शिवाय कधी-कधी ऑटो युमीन असल्यामुळे कमी होऊन परत वाढतो व परत कमी होतो असा लपंडाव चालू असतो.
पण शास्त्रीय आयुर्वेदिक औषधांचा उत्तम उपचार, पथ्य व नियमित चिकित्सा यामुळे हा रोग हळूहळू बरा होऊ शकतो.
आयुर्वेदाकडे वळूया...
आयुष्य मुक्तपणे जगूया...
Comments
Post a Comment