कोड - एक आयुर्वेद उपचार पद्धती आयुर्वेदमध्ये त्वचारोगवार यशस्वीरीत्या उपचार होतात. मग तो सोरायसिस असो की कोडासारखा आजार असो दीर्घकाल उपचाराने त्यावर इलाज होतो. कोडासारख्या आजाराला समाज विचित्र नजरेने बघत असल्यामुळे कोड झाला असे वाटल्यास लगेच रुग्णांची झोप उड़ते. रुग्णाचे टेंशन वाढते. त्याबद्द्ल सतत विचार करणे , मानसिक ताण घेणे हयातच रुग्ण गुरफटत जातो ह्यावर यशस्वी आयुर्वेद उपचार करणाऱ्या प्रसिद्ध सौंदर्यतज्ञ व त्वचारोगतज्ञ डॉ. सौ. नेहा डोणगावकर रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत . प्रश्न - ह्या आजारावर रुग्णाच्या मनात साशंकता का असते ? उत्तर - रुग्णाला असे वाटणे अगदी साहजिकच आहे. कारण रुग्णाने भरपूर ठिकाणी उपचार घेतलेले असतात. त्यामध्ये त्याला म्हणावा तितकासा फरक पडलेला नसल्याने त्याची विचार करण्याची नकारात्मक प्रवृती झालेली असते. ह्यासाठी नियोजनबद्ध उपचार पद्धती, उत्तम मार्गदर्शन, आहारपद्धती ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी असतात. ह्या पद्धतीची उपचार पद्धती खूप कमी ठिकाणी दिल्या जाते. शिवाय रुग्णाचा सर्वा...
Posts
Showing posts with the label Patient
Psoriasis and Ayurveda
- Get link
- X
- Other Apps
सोरायसिस आणि आयुर्वेद सोरायसिस आणि आयुर्वेद हा एक चर्चिल्या जाणारा विषय आहे. सोरायसिस हा खुप चिवट त्वचारोग आहे. आयुर्वेदात ह्याची तुलना किटिभ कुष्ठ ह्या रोगाशी चरक संहितेत केली आहे. आधुनिक शास्त्रानुसार ऑटोइम्युन डिसीज असून तो खुप त्रासदायक समजल्या जातो. त्यासाठी स्टिरॉइड वापरून काही प्रमाणात आटोक्यात आणता येतो, पण त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होवू शकतात. शरीरातील व्हायटल ऑर्गन जसे की यकृत, किडनी ह्यावर त्याचा विपरीत परिणाम झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. आयुर्वेद हे एक परिपूर्ण शास्त्र आहे ज्यात तुमचा आहार-विहार, मानसिक आरोग्य ह्या सर्वांचा विचार करून चिकित्सा केल्या जाते. त्यानुसार रुग्णाचे आहार-संतुलन,मानसिक-संतुलन योग्य राखुन असे किचकट आजार बरे केल्या जातात. आधुनिक शास्त्राचे उदाहरण घेतल्यास सोरायसिस चे सात प्रकार आहेत : प्लाक सोरायसिस गुट्टाटे सोरायसिस पसच्युलर सोरायसिस एरथ्रोडर्मिक सोरायसिस नेल सोरायसिस सोरायटिक ऑर्थरायटिस पालमोप्लांटर सोरायसिस ह्या प्रकारानु...