का नाकारल्या जातो कोड?

       अनेक प्रकारचे आजार दिसुन येतात. कॅन्सरपासुन सर्दीपर्यंत पण कोड झाल्यावर कुणीही डिप्रेस का होतो. रुग्ण अनुभव सांगताना म्हणतात आम्ही खुप ठिकाणी फिरलो सगळे म्हणतात घेउन पहा औषधी आम्ही सांगु नाही शकत. मग तर आम्ही गळुनच गेला काय करावे ताई, बघा ना तरुण मुलगी काय आणि मुलगा काय तापच ना हो डोक्याला.

       गेल्या २०-२२ वर्षाचा कोडाच्या रुग्णासोबत चा एक डॉक्टर म्हणुन केलेल्या प्रवासाचा आढावा घेतला तर रुग्ण वर्षानुवर्षे गोंधळातच जगतो. नेमके काय करावे, कुठली ट्रिटमेंट चालू ठेवावी, ही तर स्लो आहे मग ती दुसरी फास्ट होईल का, मग त्याने तिकडे जा म्हटले हयाने ईकडे जा म्हटले मग नेमके काय करावे मग सारखे डॉक्टर व ट्रिटमेंट बदलण्याचे काम सुरु होते. काही प्रमाणात स्लो, काही प्रमाणात बरे असा प्रवास आयुष्यभर चालु राहतो मग प्रचंड नैराश्य, ताण व हया आजाराच काय खर आहे. जाउ दया मग- परत वाढु लागला की घाबरुन डॉक्टर गाठायचा आणि परत सुरु करायचे असा हा प्रवास.

कोड होण्याची कारणे – आयुर्वेदानुसार कोड होण्याची कारणे प्रामुख्याने 1) आहार,  2) तणाव,  3) ईतर आजाराचा परिणाम , 4) कुटुंबातील असलेली अनुवंशिकता,  5) हल्ली दिसणारा अचानक वातावरण बदल.
आपण ऐकलेय की मेलॅनिनचे स्ञाव कमी होतो. पण तो एकदम कमी होत नसतो त्याची कारणे वाढत गेली की मग पांढरे डाग येतात ते कसे आपण बघु.
1) आहार – आयुर्वेदात  विरुध्दान्न खाऊ  नये, जास्त आम्ल पदार्थ, अभिष्यंदी पदार्थ वर्ज्य करायला सांगितले. त्यामागे सायंटिफीक कारण असे आह की जेव्हा शरीरातील सेल्समध्ये इन्फ्लमेशन  तयार होते. तेव्हा त्यावर अनेक रिऍक्शन होउन शरीराला रंग देणाऱ्या पिगमेंटस् ची पिगमेंटेशनची क्रिया मंदावते.  तीच्या मध्ये अनेक गुंतागुंतीची क्रिया होउ शकते. आहारामध्ये जंक फुडस्, सोर फुडस्, स्पायसी फुडस् हयामुळे  त्यावर परिणाम होउन मेलॅनिन तयार होण्याची क्रिया कमी होते. जेनेटिक, न्युरल, ऍटोइम्युन, बायोकेमिकल आणि मेलॅनोसायटोरॅजिक इतक्या गोष्टी असु शकतात. रुग्णाचा  ईतिहास घेतांना हया डीस्टींगविश होतात. त्यानुसार चिकित्सा कशी करावी ते पण ठरवता येते. आहार घेतांना त्याला सप्रेस करणारी म्हणजे मेलॅनिन क्रिया मंदावणारी  आहारातील घटकद्रव्ये शोधावी लागतात.

2) णाव – आपण ताणाव का घेतो?  त्याने काय होते. विचार केले तर काहीच नाही केले तर खुप आहे. स्ञिया वर्षानुवर्षे भावना दाबुन ठेवतात मग भावंना, न आवडलेल्या गोष्टी न बोलण्यामुळे त्याचा शरीरावर खुप वाईट परिणाम होतो. हा प्रकार मध्यमवयीन स्ञियांच्या बाबतीत घडतो. तर नवीन पिढीमधील वर्कींग महिला, पुरुष हयांच्यामध्ये दैनंदिन ताण तणाव, शाळकरी मुला मुलींमध्ये अभ्यास त्यासाठी असणारे पालकांचे प्रेशर असे विविध ताणतणाव असतात. आता हे घ्यायचे किती की जेणेकरुन शरीरावर त्याचा खूप जास्त परिणाम होउ नये. हयासाठी आपण व्यायाम, प्राणायाम, योगा हया  गोष्टीचा वेलनेस साठी वापर करु शकतो. हयाचा औषधी उपचारासोबत रिकव्हरीसाठी वापर केल्यास उत्तम.

3) ईतर आजार – प्रामुख्याने  महिलांमध्ये थॉयरॉईडचे प्रमाण जास्त ‍दिसून येते. त्याशिवाय पुरुषांमध्ये डायबिटिस त्यानंतर ईतर त्वचारोग एक्झीमा, सोरायसिस, सिस्टीमिक ल्यूपस ईरेथमॅटस्, जुनाट ऍलर्जीमुळे  झालेले त्वचारोग हयामध्ये व्हिटीलीगो होण्याचे खुप चान्सेस असतात.

4) अनुवंशिकता – हयाबददल बरेच प्रवाद आहेत पण आपण जसे घरात कुणाला कुठलाही मग तो व्हिटीलीगोच नव्हे तर मधुमेह पण असल्यास विशेष काळजी घेतो, त्याप्रमाणे आयुर्वेदानुसार तिसऱ्या पिढीमध्ये येऊ शकतो. ही एक शक्यता आहे त्यासाठी घाबरुन जाण्याची आवश्यकता अजिबात नाही. एपिडर्मिलॉजिकल स्टडीनुसार अनुवंशिकतेत  जास्त शक्यत असते. अंदाजे चार पैकी एक व्हिटीलीगो रुग्ण हा दुसरा ऍटो इम्युन डिसीज, पर्निशियस ऍनिमिया, ऍटोईम्यून थॉयरॉईड,रुम्लॅटॉईड अर्थरायटिस्, वयानुसार होणारा डायबेटिस मेलाईटस नंबर दोन, ऍडिसन्स डिसीज एस. एल. ई. नावाचा त्वचारोग यापैकी एक असतोच.

       हयामध्ये एक नाही तर अनेक जीनस् गुंतलेले असतात. त्यापैकी एन ए एल पी, हा जी. व्ही सोबत मिसळून  पांढरे डाग तयार करतो. हयामध्ये कमीत कमी तेरा प्रकारचे ईंटरल्युकान अटॅच होउन हा कोड तयार होतो. म्हणुनच व्हिटीलीगोला मल्टी फॅक्टोरिअल त्वचारोग म्हटल्या जाते. प्रत्येक पेशंटची वेगळी  केस स्टडी असते. त्याला होणारा
आजार, डयुरेशन, कारणे, अनुवंशिकता, दैनंदिन जीवनाचा भाग हया सर्वांना विचारात घेउन रुग्णाला औषधी उपचार करणे एक रुग्ण व डॉक्टराचा महत्वपुर्ण प्रवासच आहे. त्यासाठीच नियमित औषधी घेणे, आहाराचे पालन करणे, सकाळच्या कोवळया उन्हात बसणे, तणावाला बाय बाय करुन आनंदी राहणे, सतत नैराश्य, उदासिनता, त्याबदद्ल सतत विचार करणे, सारखे शरीराला बघणे, वाढले की कमी झाले डाग, कुठे नवीन आले का? हयाबददल सतत भिती व चिंता बाळगणे हया गोष्टी प्रर्कषाने टाळाव्यात. मग कोड नक्कीच जाईल. 

Comments

Popular posts from this blog

Winter Skin Conditions of Psoriasis and Ichthyosis

MELASMA - AYURVEDA AND MODERN CONCEPTS