हिवाळयात सांभाळा सौंदर्य !!!

Image result for winter and skin

       थंडीच्या दिवसात त्वचेचे सौदंर्य व केसांची निगा कशी राखावी हयाची स्ञी पुरुषांना काळजी वाटते. कोरडी त्वचा होणे, केसात कोंडा होउन केस गळणे हया समस्या खुप प्रमाणात दिसुन येतात.

प्रश्न –हिवाळयात त्वचा कोरडी पडणे, काही लोकांना पिंपल्स शिवाय  ईतर त्वचेच्या काय समस्या उद्भवतात ?
उत्तर – जास्त प्रमाणात त्वचा कोरडी  होणे तळहाताला तळपायाला भेगा पडणे, कोरडया त्वचेला खाज येणे हया सौंदर्याला बाधा आणणाऱ्या समस्या दिसुन येतात. खुप जास्त कोरडया त्वचेमुळे एलर्जीक त्वचारोग, सोरायसिस, डर्मेटायटिस हयासारखे आजार पण हिवाळयात दिसुन येतात. कोरडया त्वचेमुळे पॅची त्वचा, वांगाचे प्रमाण वाढते, डोळयाखाली सुरकुत्या हयाचे प्रमाण वाढते. शिवाय  कोरडया त्वचेकडे लक्ष न दिल्यास सोरायसिस सारखे गंभीर त्वचारोग होउ शकतात त्यामुळे सौदंर्याला बाधा निर्माण होते, खाज खुप येउन रुग्ण हैराण होतो. कधी कधी हयाचे निदान उशीरा होते. लवकर  लक्षात येत नाही. त्यामुळे  कोरडया त्वचेची काळजी घ्यावी. आहारात चांगल्या तुपाचा वापर रोज  2-3 चमचे असावा. सकस आहार घ्यावा रोज तिळाचे तेल व बदाम तेल समप्रमाणात एकञ करुन राञी झोपतांना संपुर्ण शरीराला हलक्या हाताने मसाज करावी. किंवा स्नानापुर्वी अर्धा तास कोमट तेल करुन त्याने मसाज करावा व दुधात उटणे कालवुन त्याने स्नान करावे. पाणी थंडीत पिल्या जात नाही म्हणुन कोमट करुन प्यावे. राञी झोपतांना कोमट पाण्यात किंवा कोमट दुधात 1 चमचा तुप टाकुन प्यावे .

प्रश्न –हिवाळयात कुठले गंभीर आजार सौंदर्यात बाधा निर्माण करु शकतात ?
उत्तर -  सोरायसिस, डर्मेटायटिस, सिबोरिक डर्मेटायटिस, केसातील नॉर्मल  कोंडा, पिंपल्स, चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, डोळयाखालील सुरकुत्या हयामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होउ शकते. हयासाठी सोरायसिस साठी आयुर्वेदात परिपुर्ण चिकित्सा आहे. त्यासाठी आयुर्वेदीक तेल, क्रीम शिवाय कोरडी त्वचा नॉर्मल होण्यासाठी पोटातुन  घ्यावयाची उत्तम औषधी उपलब्ध आहे.
डर्मेटायटिस हयामध्ये कोरडी त्वचा,‍ सिबोरिक  डर्मेटायटिस मध्ये केसांमध्ये खुपच कोंडा होतो. पुर्ण स्काल्प कोरडा  होतो. वरचेवर कोंडा निघत राहतो त्यामुळे केस प्रचंड प्रमाणात गळतात. हयावर आयुर्वेदात उत्तम उपचार आहेत. हया कोरडया त्वचेच्या मुळाशी एक संपुर्ण कारणमिमांसा आयुर्वेदानुसार सांगितल्या गेली आहे. त्याबदद्ल बघु या.
       त्वचा पुर्णत: नॉर्मल असतांना हळुहळु कोरडी व्हायला लागते. रोजच्या आहारातील ञुटी, कोरडा आहार हयातुन हळुहळु पित्ताचे, वाताचे व कफाचे प्रमाण बिघडुन जाते. त्याचा परिणाम बध्दकोष्ठता, पचन व्यवस्थित न  होणे त्वचा कोरडी पडायला लागणे, त्वचा निस्तेज व सुरकुतलेली दिसणे. वय जास्त दिसणे, त्वचा खराब झाल्यास वय जास्त  दिसायला लागते. हया सर्व गोष्टीचा विचार  करुन व त्वचारोगाचे मुळ कारण  शोधुन आयुर्वेदात चिकित्सा केल्या जाते. त्यामुळे त्वचारोगाची चिकित्सा एकदम परफेक्ट होते.

प्रश्न – सौंदर्यामध्ये केसांच्या समस्या येतात त्याबद्ल काय सांगता येईल ?
उत्तर – हल्ली केसांच्या समस्या खुपच वाढल्या आहेत. केस गळणे, पांढरे होणे, केसांना चाई लागणे, पुरुषांमध्ये  टक्कलचे प्रमाण खुप वाढत आहे. केसांमध्ये कोंडा 100 पैकी 5 लोकांना दिसुन  येते. त्यामुळे केस विरळ होतात, शिवाय  खुप सारखे शाम्पु व कंडीशनर बदलत जाणे हयामुळे केसांची हानी होते. तेव्हा केस गेल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा त्याची काळजी आधीच घ्यायला हवी.
केस गळण्याची समस्या हिवाळयात खुप जास्त प्रमाणात  दिसुन येते. हवेतील कोरडेपणा व नेहमीचे प्रदुषण हयामुळे डोक्याची त्वचा कोरडी पडायला लागते. कोंडा तयार होउन डोके खाजणे, डोक्यात  बारीक बारीक फोड होणे, हयामुळे केसांची खुप हानी होते शिवाय हाच कोंडा चेहऱ्यावर पडुन चेहऱ्यावर बारीक फोडे येउ लागतात. त्याचे पिंपल्स मध्ये रुपांतर होउन चेहरा सुध्दा विद्रुप दिसायला लागतो. केस पातळ झाल्यास व्यक्तिमत्व व  सौंदर्य दोन्हीस बाधा येते. तेव्हा  केसांची काळजी घ्यावी आठवडयातुन दोनदा  केसांना आयुर्वेदिक तेल मसाज करावा. त्यानंतर केमिकल कमी प्रमाणात असलेल्या शाम्पुचा वापर करावा. बाहेर जातांना केस झाकुन घ्यावे. हलक्या हाताने कोम्बिंग  करावे. आहार केसांना पोषक असावा.

आहार – हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त आहार, सॅलेड, बीटचे प्रमाण भरपुर असावे. ताजे दही, ताज्या दहयाचे ताक, मोड आलेली कडधान्ये हयाचा आहारात समावेश असावा. लोणची, पापड जास्त मीठ अजिबातच  खाउ नये.

       केसांचे रोग म्हणजे चाई लागणे, टक्कल पडणे हयावर आयुर्वेदात रक्तशुध्दीवर चिकित्सा केल्या जाते. केसाची मुळे विशिष्ट प्रकारच्या कृमिनि कुरतडयामुळे चाई लागणे हा प्रकार आयुर्वेदात सांगितल्या गेलेला आहे. त्यावर आयुर्वेदात सांगितल्या गेलेला आहे. त्यावर विशिष्ट प्रकारचे लेप, पोटातुन घ्यावयाची औषधी ही परिपुर्ण चिकित्सा केल्याने तिथे परत केस येतात व पुर्ववत होतात तेव्हा हिवाळयात सौंदर्य सांभाळण्यासाठी आयुर्वेद उत्तमच आहे. हयात दुमत नाही.

Comments

Popular posts from this blog

Winter Skin Conditions of Psoriasis and Ichthyosis