Turmeric
गुणकारी -
- हळदीत आढळून येणार करक्युमिन नावाचा घटक याला पिवळं रंग देतो. तो कलरिंग एजंटप्रमाणे काम करून त्वचेचा रंग खुलवतो.
- अँटीसेप्टिकशिवाय हळदीत अँटीबॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे हळद त्वचेसाठी उपयुक्त आहे.
- हळद अँटिऑक्सिडंटचे काम करते. त्वचादेखील तरुण राहते. त्याचबरोबर त्वचेवरील सुकूत्या किंवा इतर समस्यांपासून बचाव होतो.
आंबेहळद प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते. आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. ती पोटात देत नाहीत. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात. कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त सकाळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना शांत होतात. शरीरातील कोणत्याही भागात गाठ अली असेल तर आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.
पूर्वीपासून अगदी पाय मुरगळला, जखम झाली, टॅप कणकण आली कि सर्वांच्या घरात लगेच प्रथम हळद वापरली जायची. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत खोकला आला कि, हळद दूध ठरलेलंच. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याच एक विलक्षण सामर्थ्य या हळदीत आहे. आपल्याच परंपरेत, मसाल्यामध्येच एवढा मोठा आरोग्याचा साथ दडलाय, कि जो आपणास कित्येक वर्षे कर्करोगासारख्या दुर्धर आजारापासून वाचवत आहे हे आपल्यालाच माहित नाही हे आपले दुर्देव. याबाबत आपल्या आयुर्वेदाचे ऋषी-मुनींचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, कारण त्यांच्यामुळेच काळात नकळत आपल्या आरोग्याचे अजूनही रक्षण होत आहे.
Comments
Post a Comment