मेलाझमा (वांग) –
क्रीटिकल
चेहऱ्यावरील काळे
डाग ज्याला आयुर्वेदात व्यंग किंवा प्रचलित भाषेत वांग म्हणतात. मार्डन मध्ये
मेलाझमा हा शब्द ग्रीक भाषेत मेलास म्हणजे काळे हयावरुन आला आहे. हा प्रकार
पुरुषांमध्ये फार कमी आणि स्ञियांमध्ये जास्त प्रमाणात आढळुन येतो. एकतर सौंदर्यात
बाधा आणणारा आणि अतिशय चिवट असा हा त्वचेचे सौंदर्य नष्ट करणारा स्ञियांमध्ये हा
जास्त का आढळुन येतो.
हार्मोन्स – स्ञियांमध्ये
गरोदरपणात, डिलीव्हरीनंतर किंवा संतती प्रतिबंधक औषधांच्या सतत वापराने चेहऱ्यावर हळुहळु
उमटू लागतो. काही कॉस्मेटिकच्या वापराने किंवा थायरॉईडचे कार्य सुरळीत नसल्यामुळेही
होऊ शकतो. तसा हा शरीरात ञास देणारा नसला तरी लवकर जात नसल्यामुळे स्ञिया जास्त
कंटाळतात.
सन-एक्सपोजर – सूर्यकिरणामध्ये
असलेल्या अल्ट्राव्हायोलेट त्वचेच्या स्तरामध्ये असणाऱ्या मेलानोसाईट्सचे प्रमाण
वाढते. त्याला अल्ट्रा मेलॅनोसाईटसि स्टिल्युलेटिंग हार्मोन्स म्हणतात. शिवाय
ईंटराब्युकॉन १ आणि एन्डोथेलिन १ हवा. तिन्ही गोष्टी मेलॅनिनचे प्रमाण वाढविण्यास
जबाबदार असतात. शिवाय डर्मल लेअरमध्ये असलेले फायब्रोब्लास्ट सुध्दा मेलॅनिन
वाढविते. त्यामुळे मेलॅनोजेनेसिस वाढते. हयात अजून स्टेथ सेल फॅक्टर, टायरोसिन
कायनेज रिसेप्टर पण अजून मेलॅनिन वाढविण्यास मदत करते. त्यामुळे बऱ्याचदा खूप दिवस
उन्हाचा संपर्क आल्याने डार्क ब्लॅक झालेली त्वचा परत त्याच्या नॉर्मल लेव्हलला
येत नाही.
सर्व कलप्रीट एकञ
होऊन त्वचेचे काळेपण तयार करण्यास कारणीभूत ठरते त्यावरुन किती फॅक्टर त्याला इनव्हॉल्ह
असतात हे लक्षात येते. त्यावरुन मंडळी सारखी डॉक्टर बदलत फिरत असतात आणि बरे होत
नाही म्हणून तक्रार करत असतात. पांढरे डागांप्रमाणेच हे काळे डागपण बरे करणे अवघड
प्रश्न आहे.
काही जणांमध्ये
फॅमिलीमध्ये पण आढळून येते १०० पैकी १५ लोकांमध्ये जेनेटिक हिस्ट्री आढळून येते.
काही जुळया लोकांमध्ये पण दिसून येते. दुषित सुर्यकिरणांमुळे सेल्युलर स्तरावर
ऑक्सीडेशन होउन फ्री रेडीकल्स तयार होतात आणि मेलॅनोसाईट्सना स्टिम्युलेट करतात आणि मेलॅनिन जास्त तयार व्हायला लागते. प्रेग्नंट
स्ञियांमध्ये जसे ईस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि मेलॅनोसाईट्स स्टिम्युलेटिंग लेव्हल
थर्ड टायमेस्टर मध्ये वाढले तसेच मेनॉपॉज नंतर स्ञियांमध्ये परत वांग
प्रोजेस्टेरॉनमुळे वाढतो. ईस्ट्रोजनमुळे वाढत नाही. हयावरुन प्रोजेस्टेरॉन जास्त
महत्तवाचा रोल मेलाझमाध्ये करतो. फार क्वचित पण दिसून येतो. क्वचित दोन टक्के स्ञियांमध्ये
ईमोशनल स्ट्रेस वाढविल्यामुळे MSH जास्त प्रमाणात तयार आणि दूषित सूर्यकिरणे हे जासत
प्रमाणात दोषी आहे. डाग वाढविण्यासाठी हे जास्त जबाबदार आहे. शिवाय फोटोटॉक्झीक आणि
फोटोऍलर्जिक औषधे, काही विशिष्ट कॉस्मेटिक्स पण असे होते. कुठल्याही वंशाचे लोकांना
हे दिसुन येते. स्टेट्समध्ये पाच मिलियन लोकांमध्ये त्यातल्या त्या स्ञीयांमध्ये
जास्त दिसून येते. गरोदरपणानंतर मग लेनॉपॉज
हा कधीही होऊ शकतो.
त्वचेच्या स्तरापैकी वरच्या थरावर ज्याला इपिडर्मिज
म्हणतो. जास्त दिसून येतो. काही त्यापेक्षा खालीच्या डर्मल स्तरावरपण जातो
हयामध्ये अजून एक मोठा फॅक्टर आहे, रूग्णाची त्वचा सतत सूर्यकिरणांच्या संपर्कामध्ये
जास्त असते त्यामुळे रिकरन्स दिसून येतो. त्यासाठी सनस्क्रिन वापरले तरीही येणारच
नाही असं सांगता येत नाही. संपर्क किती वेळ, किती तीव्र किरणांसोबत आला हे नाही प्रेडिक्ट
करता येत. त्वचेची सेन्सिटिव्हीटी व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक
व्यक्तीचा त्वचेचा कॉम्पलेक्शन कसे असेल त्यावर ब्राउन, ब्लॅक प्रकारचे डाग दिसून
येते. शिवाय वरचे ओठ, हनुवटी यावरपण दिसून येते. काहीत नाक आणि गालावर तर काहींच्या
हातावर, मानेवर, पाठीवरपण दिसून येते. वूड्स लॅम्पमध्ये प्रत्यक्ष तपासणी केल्यास
ईपिडर्मिज वरील ईलीव्हीटेज पिगमेंट दिसून येतात. त्यापेक्षा खोल डर्मिजचे नाही दिसून
येत. काही डाग कॉन्टॅक्ट डर्मटायटिसचे तर लायकेन प्लॅनसचे ड्रगमुळे फोटोसेन्सिटिव्हीटीने
झालेले असे बरेच प्रकार असू शकतात.
आयूर्वेदातील मेलाझमा
थेरपीमध्ये औषधाचा वापर करताना ऑक्सिडेशनमुळे वाढलेले फ्री रॅडिकल्स कमी
करण्यासाठी नॅचरल ऍन्टी- ऑक्सिडंट औषधी आणि बाकी हार्मोन्स व इतर कारणानुसार,
थायरॉईड असेल तर त्यानूसार हयावर इंटरनल व हर्बल क्रीम खूप उपयूक्त ठरतात. माञ
उपचार जास्त दिवस, 6 महिने तरी करावे लागतात कमीत कमी.
Comments
Post a Comment