त्वचारोगामध्ये अंगाला खुप खाज सुज येणे हा प्रकार बऱ्याच प्रमाणात २० टक्के लोकांमध्ये दिसुन येतो. याची कारणे बरीच असतात. याला आयुर्वेदात तीन भागात विभागल्या
गेले आहे. शितपित्त , उर्दद, कोठ आयुर्वेदात पित्तदोषाने स्वस्थान सोडल्यामुळे त्वचेवर
यायला सुरुवात केलेली गोष्ट म्हणजे
अर्टिकेरीया. आयुर्वेदात पित्तदोष आणि वायुदोषाची एकञीकरण झाल्यामुळे वायुची चंचलता
आणि पित्ताची उष्णता यामुळे त्वचेवर भराभर ही सुज, आग आणि विंचु किंवा एखादया
किटकदंशाची जाणीव झाल्यासारखी वाटते. ही लक्षणे आणि मार्डनमध्ये सांगितलेली जवळपास
सारखीच दिसुन येते.
त्वचारोगतज्ज्ञ अर्टिकेरिया किंवा हाईव्ह म्हणतात त्यानुसार एखादया ऍर्लजेन
शरीराशी संबंध आल्यामुळे त्वचेची होणारी रिऍक्शन म्हणजे हा आजार. अचानक
त्वचेवर लालसर फोडे येऊन सुज येउन पसरत जातो. खाज, आग, डंख मारल्यासारखे शरीरावर
होते. चेहरा, ओठ, जिभ, कान, घसा, हातपायावर येऊ शकते. कधीकधी एक ते दोन- तीन
तासात आपोआप जाते. अँजिओडीमा मध्ये डोळयाजवळ, घश्याला, ओठाला, हाताला खुप जास्त सूज येते.आहारातुन जाणारे कुठलेतरी अन्न,मेडिसीन,कीटकदंश पॉलनग्रेन्स किंवा एखादया
त्वचारोगामध्ये एक लक्षण असु शकते.खुप
जास्त प्रमाणात येणारा ताण व चिंता यामुळे अँजिओडीमा होऊ शकतो. बऱ्याच लोकांना उन्हात गेल्यावर ईन्फेक्शन्स उदा. घश्याचे इन्फेक्शन,
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स, फुप्फुसाचे
इन्फेक्शन्स, कानाचे, हाताचे ईन्फेक्शन्स, एखादयाला हार्मोनल बॅलन्स बिघडल्याने पण होतो, थायरॉईड मुळेपण काहींना होतो.ईडिओपॅथीक अर्टिकेरीया यामध्ये कारण लक्षात येत नाहीत.
इन्फेक्शन्स, कानाचे, हाताचे ईन्फेक्शन्स, एखादयाला हार्मोनल बॅलन्स बिघडल्याने पण होतो, थायरॉईड मुळेपण काहींना होतो.ईडिओपॅथीक अर्टिकेरीया यामध्ये कारण लक्षात येत नाहीत.
ऍटोइम्युन
आर्टिकेरिया यामध्ये काही कारणामुळे तुमचे शरीर अँटीबॉडीज तयार करतात त्या त्वचेवर हल्ला
करतात.खुप जुनाट झाल्यानंतर किंवा एन्डोक्रेंन डिसीज चे एक लक्षण म्हणूनही हा दिसून येतो. ह्यामध्ये mast cell and basophil involvement होऊन histamine त्वचेवर जास्त प्रमाणात येते.
फिजीकल आर्टिकेरिया म्हणजे जेव्हा शरीरात खुप जास्त हिट तयार होते म्हणजे व्यायाम करताना, गरम पाण्याने स्नान करताना, खूप घाम आल्यावर, खूप उन्हात फिरल्याने होणारा, त्यानंतर थंड पाण्यात, थंडीत होणारा कोल्ड आर्टिकेरिया अजुनही काही प्रकार आहेत.
फिजीकल आर्टिकेरिया म्हणजे जेव्हा शरीरात खुप जास्त हिट तयार होते म्हणजे व्यायाम करताना, गरम पाण्याने स्नान करताना, खूप घाम आल्यावर, खूप उन्हात फिरल्याने होणारा, त्यानंतर थंड पाण्यात, थंडीत होणारा कोल्ड आर्टिकेरिया अजुनही काही प्रकार आहेत.
हाईव्हज आणि अँजिओडीमा मध्ये हिस्टॅमिनचा महत्तवाचा रोल आहे. रक्तातील प्लाझ्मा बारीक
व्हेसल्स त्वचेवर लीक करते आणि सेल्समधुन हिस्टॅमिन रिलीज होउन दोन्ही त्वचेवर
किंवा ईतर अवयवांवर येते. हयामध्ये बरेच ऍलर्जी टेस्ट केल्यास कुठलीही फूड पौलन्स,
विशिष्ट झाडाची, फुलाची, पानाची, फळाची, रंगाची, विविध प्रकारच्या
ईन्व्हायरमेंटरची ऍलर्जी असू शकते. मेडीसीनमध्ये ऍस्पिरीन, अँटी ईन्फल्मेटरी मेडीसीन, उदा. आयबुप्रोफेन, कोडीन, पेनकिलर्स हयामुळे पण येऊ शकते.
जुनाट अर्टिकेरीयाचे कारण शोधणे
अवघड जाते. हयामध्ये थॉयरॉईड हेपॅटायटिस, कॅन्सर पण असू शकतो. जेव्हा फुप्फुसावर,
अन्ननलिकेवर पण परिणाम होतो तेव्हा श्वास घ्यायला ञास होणे, उलटया, पातळ संडास होणे,
स्नायुमध्ये कोरडेपणा येणे, आधुनिकशास्ञात ऍलर्जी टेस्ट केल्या जाते. किंवा
अँटिहिस्टॅमिनिक औषधे दीर्घकाळ दिल्या जाते अचानक झाल्यास ओल्या कपडयाने शरीर
पुसून काढणे, झोप घेणे. सुती आणि ढगळे कपडे वापरणे. कधीकधी त्यासोबत चक्कर, जडपणा,
श्वासाला ञास झाल्यास काळजी घ्यावी लागते.
या सर्व प्रकारच्या ऍलर्जी आणि अर्टिकेरिया पाहिल्यावर वातपित्त
दोषाला मूळस्थानावर आणून चिकित्सा केल्यास उत्तम उपशय मिळतो. आयूर्वेदात समाग्नीला
खूप महत्तव दिल्या गेले आहे. शरीरातील अन्नाचे उत्तमरीत्या पाचन होऊन मल, मुञ, स्वेद
यातुन शरीरातील असात्म्य पदार्थ बाहेर पडले
पाहिजे तेव्हा अर्टिकेरिया आणि ऍलर्जी हयावर शरीराला प्रतिक्रिया देण्याची गरजच पडणार
नाही का शरीर रिऍक्ट करते ?
कारण आतील दोषाचे स्थान बिघडले असते. अन्नाचे पाचन करण्यासाठी पित्ताचे
स्थान आहे. अन्नवह स्ञोतसे ते सोडून पित्त शरीरात रक्तासोबत प्रवाहित झाल्यास त्याचा
उष्ण गुण रक्ताला देणार, अपक्व आहाररस शरीरात फिरणार आणि त्यामुळे विषासमान
असणारा हा अपक्व आम रक्त, त्वचेवर धुडगुस घालत फिरतो. हा शरीरात सदोष आहार, अधारणीय
वेग धारण केल्यास कुठे जाईल ती घाण, शरीरातच राहणार, शाळेत, ऑफिसमध्ये, गडबडीमुळे
नंतर जाउ टॉयलेटला हयाचा तर फारच वाईट परिणाम होतो. आयूर्वेदातील दिनचर्या पाळल्याने फार कमी
होऊ शकतात हे आजार. शिवाय शरीरात दिवसागणीक व वाढत्या वयानुसार होणारे सेल्स् मधील
ऑक्सीडेशन, ग्लायसेशन, हामोन्समधील असंतुलन, आजच्या काळातील विदयार्थी ते तरूण सर्व वयोगटावर असणारा ताणतणाव यामुळे त्वचेचे आजार वाढत चाललेय आणि हार्मोन्सशी
संबंधीत विकार पण वाढताय. तरूण मुलीत पीसीओडी आणि स्त्रियांमध्ये थॉयरॉईडचे प्रमाण खुप
जास्त वाढत चालले आहे. त्यासोबत त्वचेचे आजारही आयुर्वेदातील दोषानुसार केली जाणारी चिकित्सा आणि वनस्पतीचे
औषधीयुक्त गुण त्यांच्या संयोगाने जुनाट अर्टिकेरियावर उत्तम उपचार होऊ शकतात.
अतीशय साध्या व सोप्या भाषेत मंँड शास्त्रशुद्ध माहीती सागीतली. लोकांना याची माहीती नसते . नक्कीच जे रूग्ण अशाप्रकारे बाधीत असतील त्यांना संजीवनी सापडी म्हणायला हरकत नाही. मीमागे बरेच व्हिडीओ बघीतले खरचखआपली उपचार पद्धती उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. यात शंकाच नाही 🙏🙏🙏
ReplyDeletePeople are diverting towards our ancient science of Ayurveda, especially for cronic skin diseases. Skin Heal Somutions is doing its best for it.
ReplyDeleteनमस्कार मँडम खूप छान सुटसुटीत व अगदी साध्या व सोप्या शब्दात , शास्त्रशुद्ध पद्धतीने माहीती सांगीतली आहे . या माहितीच्या आधारे सगळ्यांचे त्वचा विकाराविषयीचे भ्रम पण दूर होईल. व रूग्णांना यातून बाहेर पडायचा मार्ग या द्वारे सापडला म्हणायला हरकत नाही. 👍👍
ReplyDeleteतुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. व रूग्णांना त्यामुळे फायदा मिळत. 🙏🙏राहो
Just wish it was in English also..
ReplyDelete