विशीतले सौंदर्य आणि चाळिशीतले सौंदर्य
सौंदर्य हे सौंदर्यच असते विशीतले सौंदर्य वेगळे आणि चाळिशीतले सौंदर्य वेगळे. विशीतील कॉलेज तरुणींसाठी खुपच जिव्हाळ्याचा विषय असतो. सौंदर्यामध्ये नितळ त्वचा, निरोगी, दाट व काळेभोर केस आणि उत्तम बांधा ह्या तिन्ही गोष्टी येतात. आयुर्वेदातून परिपुर्ण सौंदर्य मिळविता येते. त्याला Ageless beauty म्हणता येईल. विशितली स्त्री चाळीशीतही कशी यंग लुक देऊ शकेल ह्यावरील प्रश्न व त्यांची उत्तरे-प्रश्न- डॉक्टर विशीतील कॉलेज तरुणींना काय समस्या असतात?
उत्तर - ह्या काळात चेहऱ्यावर पिंपल्स, निस्तेज त्वचा, केसांच्या समस्या , अनावश्यक केस, वाढलेल्या वजनामुळे बांधा बेडौल दिसणे, ह्या कॉमन समस्या असतात. ह्या तरुणी करिअर ओरिएण्टेड असतात. ह्यांना सौंदर्याचा न्यूनगंड तयार झाल्यास ईंटरव्ह्यू देतांना, कॉलेजमध्ये त्यांचा परफार्म करण्याचा Ratio कमी होतो. कॉन्फिडन्स कमी होतो. How we should be presentable ? ह्या गोष्टी आता खूप महत्वाच्या ठरतात. म्हणून सौंदर्य हा आवश्यक भाग आहे, नाक, डोळे, रंग ही नैसर्गिक देणगी असली तरी त्यामध्ये सौंदर्य जास्त कसे उठुन दिसेल ह्यासाठी सौंदर्य चिकित्सा घेणे आवश्यक आहे.
१) पिंपल्स - ह्यामुळे तुमचा चेहरा खूप खराब दिसतो. पिंपल्सचे काळे डाग, तेलकट त्वचा ह्यावर आयुर्वेदातील उपचाराने तीन ते सहा महिन्यात पूर्ण नितळ त्वचा होऊ शकते . शिवाय त्यासोबत तुमच्या त्वचेचा पोतसुद्धा सुधारतो. नितळ व तरुण लुक त्याला येतो.
२) सुडौल बांधा - ह्यासाठी योगासने, चालणे, जॉगिंग, दोरीवरच्या उड्या, योग्य आहार ह्याचा समन्वय साधून सुडौल बांधा शिवाय त्यासोबत आयुर्वेदातील औषधोपचार घेतल्याने बांधा सुडौल होण्यासाठी मदत होते. ह्यामध्ये तिशीतील तरुणी- जास्त मोठा बांध्यातील अडथळा म्हणजे डिलिव्हरीनंतर सुटलेले पोट, ह्यामुळे पोटावरील मसल्स loose झालेले असतात. शिवाय बेबीच्या जन्मानंतर पोट नॉर्मल व्हायला खुप वेळ लागतो. त्यावेळी योग्य ती काळजी न घेतल्यास पोट खूपच बेढब दिसते.
ह्यासाठी आयुर्वेदात स्पेशल उपचार पद्धती आहे. त्यामुळे पोटावरील सैल त्वचा हळूहळू प्राकृत होऊन पोटाचा घेर कमी होतो. बांधा योग्य होण्यास मदत होते. तरुणी मध्ये नोकरी व कॉम्प्युटर समोर जास्त बसल्याने पोट सुटणे, कंबर, मांड्या, पोटावर चरबीचा थर साचणे ह्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपचार पद्धती आहे. चाळिशीतील तरुणीस त्यांना तरुणीचं म्हणायला पाहिजे म्हतारपण नव्हे ते साठीनंतर... ह्या वयात एकूणच वजन वाढलेले असते शिवाय त्वचा सैल व्हायला लागते, त्यासाठी वेगळी चिकित्सा शिवाय उपयुक्त आहाराची जोड द्यावी लागते. त्यामुळे त्वचा सैल होण्याचे प्रमाण नगण्य होऊन तरुण लूक कायम राहतो.
त्वचा -आपल्या संपूर्ण शरीराला आवरण असते त्वचेचे, त्या त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी आहार, विहार व सोबत आयुर्वेदातील उपचार पद्धती ह्यामुळे त्वचेच्या समस्या नाहीश्या होतात.
काळवंडलेली त्वचा - ही समस्या विशीत व चाळीशीत पण दिसून येते. तरुणी मध्ये डोळयाखाली डार्क सर्कल्स, उन्हामुळे किंवा वातावरणामुळे त्वचा काळी पडते ह्या समस्या हल्ली खूप वाढतांना दिसून येते.
त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी वर्ण्यवर्धक खुप औषधी वनस्पती आयुर्वेदात उपलब्ध आहे. तीन ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण त्वचेचा लूक बदलून जातो. त्वचा नितळ, तरुण व गोरी होण्यास खूप उपयुक्त चिकित्सा आहे.
चाळीशीमध्ये चेहऱ्यावरील त्वचा सैल पडु लागते. शिवाय चेहऱ्यावर वांग येण्याची समस्या खूप स्त्रियांमध्ये दिसुन येते. वांग जाण्याचा कालावधी दीर्घ असतो . ह्यासाठी आहार,पथ्य व नियमित औषधोपचार आवश्यक आहे. काही स्त्रियांमध्ये त्वचा निर्जीव दिसणे, अजिबात आकर्षक त्वचा दिसत नाही त्यामुळे त्या सतत नाराज, चिंताग्रस्त दिसून येतात. त्यांच्या ह्या त्वचेच्या मुळाशी पित्त - आहार पचन व्यवस्थित न होणे, बद्धकोष्ठता,रक्तातील उष्णता ह्या सर्व गोष्टी कारणीभूत असतात. त्यावर परिपूर्ण चिकित्सा केल्याने मुळापासून असलेले कारण व दोष नाहीसे होऊन कायमस्वरूपी त्वचा प्राकृत होते.
केस - हा एक सौदंर्यशास्त्राचा स्वतंत्र विषय आहे. केसांच्या समस्या खूपच वाढत चालल्या आहे. तरुणींमध्ये टक्कल पडणे, चाई लागणे ह्या गंभीर समस्या दिसून येतात. सौदर्यासाठी आहार विहार कसा असावा ह्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आहार - आहार घेतांना ताज्या फळांचा ज्युस किंवा गाजराचा रस, बीटचा रस शिवाय कमी कॅलरीज असलेले ओट, कॉम्प्लेक्स ह्याचा सकाळी ब्रेकफास्ट मध्ये समावेश असावा. शिवाय ऋतुप्रमाणे जी फळे मिळतील त्याचा आहारात समावेश असावा काही फळांमुळे alkaline level वाढून acide level कमी होते त्यामुळे फिटनेस चांगला राहतो. शिवाय प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास स्त्रियांची वजन वाढण्याची तक्रार कमी होईल. व्यायाम केल्यास उत्तम सौंदर्य व स्टॅमिना दोन्ही वाढेल.
त्वचा सुंदर राहण्यासाठी हॉटेलचे जंक फूड, केक, पेस्ट्रीज, आईस्क्रिम ह्यावर बंधने घालावी लागणार किंवा मॅनेज युअर फूड हॅबिट्स जसे की महिन्यातून एखाद्या वेळेस हॉटेलिंग ठीक आहे त्वचा चमकदार राहण्यासाठी खारवलेले व आंबवलेले पदार्थ अति प्रमाणात खाणे टाळावे. शक्यतो जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळाव्या. रात्री फार उशिरा जेवु नये.
भारतीय आहार हा संपुर्ण जगात परिपूर्ण आहार मानल्या जातो. यूरोप, अमेरिकेमध्ये आपल्या आहाराची विविधता, नाविन्य ह्याचे खुप कौतुक केल्या जाते. कोशिंबिरी, चटण्या, सॅलेड, विविध गोड, आंबट, फराळाचे पदार्थ इतके प्रकार व चवी कुठल्याच देशात बघायला मिळत नाही. आपण मात्र आपला परिपुर्ण आहार सोडून पाश्चात्य आहार आवडीने खातो. acceptance is good but don't leave our basics.
प्रश्न - चाळिशीतील समस्याबद्दल अजून काय सांगता येईल ?
उत्तर - चाळिशीतील काही स्त्रियांना थॉयराइड, प्री - मेनॉपाझ ची समस्या, काहींना पाळीतील समस्या शिवाय मानसिक न्यूनगंड ह्यामुळे सुद्धा सौंदर्य समस्या येऊ शकतात. थॉयराईडमुळे कोरडी त्वचा काही त्वचाविकार, चिडचिड, एकटेपणामुळे झोप कमी झाल्यास डोळ्याखाली काळी वर्तुळे. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने त्वचा व केसांवर त्याचा वाईट परिणाम प्रथम दिसून येतो.
स्त्रियांचा आहार दोषयुक्त असतो. अन्न उरले तर सतत शिळे खातील. खूप तेलकट व चटपटीत खातील. पोट भरल्यावरही वाया जाईल म्हणून खातील आणि मग माझे वजन का वाढतेय ? म्हणुन टेन्शन घेतील. एक आठवड्याभर कडक डायट करतील दुसऱ्या आठवड्यात सर्व आवडत्या पदार्थांवर ताव मारतील. पुन्हा वजनाचा घोळ तसाच. तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. टेन्शन फ्री रहायला शिकले पाहिजे Ladies have a special ability that is multitasking , she can do everything.
आपण आपले acceptance व adaptivity वाढविली तर आहारात बदल घडून आयुर्वेदिक औषधोपचाराने सौंदर्य वाढवू शकतो. चाळीशीत तुम्ही सौंदर्य राखून आहात तर सौंदर्य टिकविण्यासाठी काही आरोग्यदायक औषधी घेता येतात. आरोग्य ,सौंदर्य टिकविण्यासाठी त्याकडे लक्ष देणे, प्रयत्न करणे, स्वतः ला अपडेट करणे आवश्यक आहे त्याप्रमाणेच सौंदर्याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. त्यापासून शरीरावर काहीही विपरीत परिणाम न होता, आपण Ageless beauty हे विशेषण स्वतःला लावु शकतो. मात्र ह्यासाठी नियमितपणा, आहाराची काळजी, औषधोपचार नियमित करणे ह्या गोष्टी खुप आवश्यक आहे. एकदा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला मेन्टेन करणे आवश्यक आहे. त्यासाठी उपयुक्त आहार आणि आठवड्यातून पाच दिवस कमीत कमी पाऊण तास चालणे, पळणे, योगा, प्राणायाम ह्यापैकी जे शक्य असेल ते करावे म्हणजे तुम्ही फिटनेस आणि ब्युटी दोन्हीही ने परिपूर्ण रहाल. आयुर्वेद हे शास्त्र रोगावर उपचार करतेच पण रोग होऊ नये म्हणून स्वास्थ्य कसे राखावे ते पण शिकविते. आयुर्वेद अमृतानांम !!
Comments
Post a Comment