रक्तदोष?(रक्तविकार)

Image result for blood purification ayurvedic concept
मनुष्याच्या शरीरातील रक्त हा अतिशय महत्तवाचा घटक आहे. मनुष्याच्या सर्व शरीरभर रक्ता ‍ भिसरण होत असते. काही अंतर्गत शरीरातील घडामोडीमुळे हया शुध्द रक्तामध्ये बदल घडुन अशुध्दता निर्माण होते. त्यातुन रक्त विकार तयार होतात.

    आयुर्वेदात वात,पित्त, कफ हे तीन दोष आहेत. काही आचर्यानी रक्तालाही दोष मानलेला आहे. रक्त हा रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा शुक्र हया सप्तधातुंपैकी एक धातु होय. रक्त धातु जेव्हा दुषीत होतो तेव्हा दुसऱ्या धातुंना विकृत करतो, तसेच दुसऱ्या दोषामुळे विकृत होतो तेव्हा अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतो. त्यापैक काही रोगांबदद्ल माहिती घेवू या.

    रक्तविकारामध्येकुष्ठहा व्याधी प्रामुख्याने मोडते. हया शिवाय विसर्प, रक्तपित्त,विद्रधी, प्रदर, वातरक्त, त्वचा वैवर्ण्य (पुर्ण शरीरांच्या त्वचेमध्ये कोरडेपणा येणे) तृष्णा, (सारखी तहान लागणे), दाह ज्वर, शिर:शुल, उदरदाह, अशक्तपणा, अनिद्रा, अतिनिद्रा शरीराची चयापचय क्रिया बिघडणे, अन्न पचन होणे, थकवा येणे हयाशिवाय अंगावरखाज, फोडे फुन्सी चकत्ते येणे, पिडीका, अरुषिंका, कोड हे आजार उद्भवतात.
आज  ऍलर्जी हा प्रकार खुपच बघायला मिळतो. हया सर्वाचे मुळ रक्तदोष होय उदा. पित्तदोषाचा प्रकोप झाल्यास रक्तातील उष्णता वाढुन त्यापासुन लालसर पुरळ, खाज येणे, त्वचेची आग होणे . लक्षणे आढळुन येतात. हया रक्तदोषाचा एक भाग त्वचारोग आहे. हा आयुर्वेदाचा मुळ तत्वविचार होय.

कारणे  रक्तदोष निर्माण होण्याची कारणे अनेक असली तरी बध्दकोष्ठता, विरुध्द अन्नपान सेवनस्निग्ध, गुरु आहार सेवन, नैसर्गिक वेगाचे धारण (मलमुञाचा अवरोध करणे प्रेशर आले तरी जाणे) वारंवार खाण्याचा अतिरेक करणे, खुप उन्हात फिरणे किंवा सारखे एअर कंडिशनमध्ये बसणे, दही मासे, गुळ तिखट, मिठाईयुक्त पदार्थ हयाचे अतिसेवन अन्नाचे पचन व्हायच्या आत परत, परत, खाणे,उन्हातुन आल्यावर थंड पाण्याने स्नान करणे, निद्रा आहार दिनचर्येचा ताळतंञ सोडणे, हयामुळे तिन्ही  दोषाचा प्रकोप होउन रक्तधातुमध्ये विकृतीनिर्माण होते.
त्वचारोगाची सुरुवात रक्तदोषामुळे होते. त्वचेवर खुप घाम येणे, अजिबात घाम येणे, त्वचा खरखरीत होणे, त्वचेचा रंग बदलणे, दाह,खाज, वेदना, चकंदळे उठणे, हया प्रकारामध्ये कुष्ठविकार विभागल्या गेलाय कापाल, औदंबर, मंडल, ऋष्यजिव्ह, पुंडरिक, सिध्म काकणक, ही महाकुष्ठे तसेच एककुष्ठ, चर्मकुष्ठ, किटिभ, विपादिका अलसक, दद्रु, चर्मदल, पांमा, विस्फोट, शतारु, विर्चचिका ही क्षुद्रकुष्ठे आयुर्वेदाने वर्णिली आहे.
    रक्तदोषामुळे विसर्प (Erysipalus)  घावणारी सुज शितपित्त (Urticaria) , खरुज(Scabies) घामोळया, पिंपल्स, गजकर्ण (Exima), खवडे, गुलम्, नाकातुन दुर्गध येणे, तोंड येणे (Stomatitis)  वातरक्त (Gout), पोटाच्या विकारामध्ये  लिव्हर डिसीज, मुळव्याध, कावीळ हे आजार होतात. हयावरुन रक्तदोषाचा गंभीरपणा लक्षात येउ शकतो.
पिंपल्स – वारंवार चेहऱ्यावर पुरळ, काळे , बारीक डाग दिसणे, वयाच्या १५, १६ हया वर्षापासुन २५ वर्षापर्यंत त्यानंतरही आढळतात. तारुण्यात हार्मोन्सच्या स्ञावातील बदलामुळे हे फोड येतात. रक्तातील दोष व हार्मोन्सचा तुलनात्मक विचार केल्यास हे कारण योग्य ठरते.

शितपित्त -  हिवाळयात थंडीच्या दिवसात उदभवते, अंगावर तांबडे, लाल चकंदळे उठणे, आग होणे ज्वर, उलटी होणे ही लक्षणे आढळतात आपोआप नाहिशी होउन पुन्हा पुन्हा येतात. हयामध्ये रक्त व पित्तदोषाची दृष्टी आढळते.

श्वेतकुष्ठ - ज्याला आपण पांढरे डाग किंवा कोड म्हणतो हयामध्ये रक्तदृष्टीमुळे त्वचेला रंग देणारी रंगद्रव्ये कमी होउन पांढरे  डाग उमटु लागतात. यकृतातुन निर्माण होणारे भ्राजक पित्तामध्ये विकृती निर्माण झाल्यामुळे त्वचेवर पांढरे डाग तयार होउ लागतात.

ईद्रंलुप्त -  डोक्याला चाई लागणे ज्याला प्रचलित भाषेत केसांना उधळी लागणे म्हणतात हयामध्ये केसांची गळती चालु होउन केसांमध्ये टक्कल दिसु लागते, टक्कल पडणे पुरुषांमध्ये , ईद्रलुप्त स्त्रियांमध्ये आढळुन येते पायाला भेगा पडणे (पाददारी) हयासारखे अनेक व्याधी,अगदी काळवंडलेल्या त्वचेपासुन, अवघड वाटणारा कोड ऍलर्जी हया व्याधींचा प्रवास आयुर्वेदाजवळ येउनच संपतो. हयासाठी योग्य आहार- विहार, अपथ्य, विरुध्दान्न सेवन टाळुन तज्ञाच्या मार्गदर्शनाने औषधोपचार घेउन निरोगी  होण्याकडे वाटचाल करु या.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Winter Skin Conditions of Psoriasis and Ichthyosis