Ayurved And Anti Ageing Concept
वय वाढायला
लागल्यानंतर चेहऱ्यावर जास्त दिसायला लागते. त्यामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे,
काळसर स्पॉट दिसणे, डोळयाखाली सुरकुत्या दिसणे, डोळयाखाली काळे होणे, त्वचा
लुज होणे इ. अनेक प्रकार स्ञी व
पुरुषांमध्ये दिसुन येतात. हयाबददल चिंता दिसुन येते. हयाची कारणे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
प्रश्न – वय दिसायला
लागल्यावर अनेक तक्रारी दिसुन येतात त्या कोणत्या व त्यावर उपाय काय?
उत्तर – छोटया छोटया
तक्रारी तर खुप दिसुन येतात. आधुनिक शास्ञ
व आयुर्वेदातील त्वचारोग (कुष्ठ) हयाची सांगड घातल्यास खालील प्रकार दिसुन येतात.
काळे डाग (लिव्हर स्पॉट) – आधुनिक शास्ञात हयाला
हे नाव आहे. हयाला एज स्पॉट पण म्हणतात. साधारणत: चेहऱ्यावर, हातावर, खांदयावर, पाठीवर, पोटावर वरच्या बाजुला दिसुन
येतात. हे एपिडर्मल स्कीन पिगमेटेंशन असुन हयाचा लिव्हरशी नावापुरता संबंध आहे.
त्वचेवर काही जागेवर तणाव निर्माण झाल्यामुळे ब्राउन कलरचे डाग तयार होतात.
फ्रिकल्सपेक्षा मोठया आकाराचे डाग असतात वय वाढायला लागल्यावर डाग वाढायला लागतात.
जास्त करुन चेहऱ्यावर दिसुन येतात. सुर्यकिरणांपासुन त्वचेची झालेली हानी भरुन काढण्याची प्रक्रिया मंदावते.
मेलॅनिन
मुळे त्वचेला व केसांना रंग मिळतो. त्याचे कमी जास्त प्रमाण मनुष्याच्या
त्वचेचा रंग ठरवित असते. कमी मेलॅनिनमुळे त्वचेचा शेड लाईट (गव्हाळ, गोरा) होतो.
सुर्यकिरणाच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणापासुन त्वचेचे संरक्षण करण्याचे कार्य
मेलॅनिन करतो. पण पुर्ण संरक्षण देउ शकत नाही.
त्यामुळे सतत उन्हात, किंवा खुप वर्षे उन्हात
काम करणे हयामुळे वय वाढत जाते तसतसे त्वचेची लवचिकता व रिजनरेशनची प्रक्रिया
हळुहळु कमी होउ लागते. चेहऱ्यावर काळसर डाग दिसु लागतात. आधुनिक शास्ञात
क्रायोसर्जरी, सर्जिकल रियुव्हल हया उपचार पध्दती आहे. आयुर्वेद शास्ञानुसार आहार,
औषधी व मसाज थेरपी हे उपचार आहेत.
हायपर
पिगमेटेंशन – हयामध्ये ओव्हर प्रॉडक्शन ऑफ मेलॅनिन होते. स्त्रियांमध्ये हयाचे प्रमाण जास्त दिसुन येते. शिवाय थॉयरॉईड, प्री मेनॉपॉज, ईतर एन्डोक्राईन ग्लॅडचे आजार,
डिलीव्हरीनंतर काही स्त्रियांमध्ये प्रकर्षाने दिसुन येते. भुवईवर, गालावर व नाकावरच
येतात. खुप जुनाट झाल्यावर लवकर जात नाही.
फ्रीकल्स
– हे खुपच बारीक आकाराचे असतात. खुप गो-या लोकांमध्ये, मुलांमध्ये पण दिसुन येतात.
आकार खुपच छोटा असतो. कालांतराने लाईट पण होउन जातात.
चेह-यावरील
सुरकुत्या – त्वचेची लवचिकता हळुहळु कमी होण्यामागे त्वचेची पहिली लेअर मधील
हायलोयुरॉनिक ऍसीडची लेव्हल कमी व्हायला लागते.
वयानुसार
कोलेजन असंतुलित व कमी व्हायला लागते. फायब्रीलीन पॉझीटीव्ह कमी व्हायला लागते.
त्यामुळे सुरकुत्या पडायला लागतात. त्वचेच्या एपिडर्मिज व डर्मिज मधील एकञितपणा कमजोर
होउ लागतो. प्रत्येक वर्षाला १ परसेन्ट हया रेशिओने कमी व्हायला लागतो.
ग्लायकोजअमिनो
ग्लायकॅन्स, कोलेजन, इलॅस्टिन, हया तीन घटकांच्या कमतरतेमुळे वय दिसायला लागणे
हळुहळु सुरु होते. चेहऱ्यावरील मांसपेशीमधील तणाव, त्याची लवचिकता त्यामधील फॅट्सचे
प्रमाण कमी होणे, हाडाच्या रचनेचा सपोर्ट डिजनरेशनमुळे कमी होउ लागल्यामुळे चेहरा
लटकल्या सारखा दिसायला लागतो, खाली लोंबल्या सारखा दिसु लागतो. त्याचा आकार बदलतो.
ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हयात आयुष्य जगतांना उत्स्फुर्तपणे जगणे, आहाराची
काळजी घेणे, स्ट्रेस कमी घेणे हयावर त्वचा , शरीर आणि मनाने तरुण राहता येणे शक्य
आहे,
सर्वात
जास्त वयासोबत सुर्यकिरणांपासुन त्वचेला नुकसान होत असते. सन एक्सपोजर आपण टाळु
शकत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर जास्त परिणाम होतो. शरीरातील आतील अवयवांवर वयाचा
परिणाम होतच असतो. पण त्वचा हे शरीराचे बाहय आवरण असुन शरीरभर पसरलेले असल्यामुळे
त्यातील बदल प्रर्कषाने जाणवत असते. जेनेटिक, ईमोशनल आणि हेल्थ स्टेटस हयावर पण
तुम्ही किती तरुण दिसता हे अवलंबुन असते.
अँटी – एजिंग उपचार –
आहार व व्यायाम हा प्रमुख दैनंदिन जीवनातला भाग तुम्हाला तरुण बनवु शकतो.
त्याबरोबर तुमच्या मनाचे आरोग्य खुपच आवश्यक आहे. हा एक दुर्लक्षीत भाग आहे. खुप
व्यायाम व आहार उत्तम पण सारखे तणाव, चिडचिड, ब्लेम गेम, आयुष्याबददल नकारात्मक भावना निर्माण होणे, अपरिपुर्णता, स्वत:बद्दल सुध्दा तक्रारी करणे, समाधान नसणे हयामुळे तुम्ही जास्त वयस्कर दिसु शकता.
त्यासाठी स्वत: ला आवडणे आवश्यकच आहे.
आहार – शरीरामध्ये
वयानुसार फ्री रॅडिकल्स तयार होतात. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस सेल्समध्ये तयार होतो.
हयासाठी आहारात अँटी- ऑक्सिडंटचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी फळांचे
प्रमाण, मोड आलेली कडधान्ये, सॅलड, प्रोबार्योटिक्स हयांचा समावेश करावा.
व्हीटॅमिन्स, पॉलिफिनॉईडस ह्यामुळे डीजनरेशन कमी होते. सेल्स रेग्युलेट करणारे, रेटिनॉल्स,
पेप्टाईडस, ग्रोथ फॅक्टरस हे कोलेजनच्या मेटॅबोलिझमवर त्यांच्या प्रॉडक्शनवर सरळ
ईफेक्ट करत असल्यामुळे हयाचा नियमित वापर आवश्यक आहे.
आयुर्वेदात करक्युमिन, सिसमॉल अँटी एजिंगसाठी हया
प्रोसेसला कमी करण्यासाठी उपयुक्त औषधी आयुर्वेदात आहे. अश्वगंधा, आवळा
हया वनस्पतीमध्ये भरपुर प्रमाणात अँटी ऑक्सीडंट आहे. त्यामुळे प्राचीन काळातील
ऋषी-मुनी चिरतरुण राहत होते. आजही ते शक्य आहे. त्यासाठी आयुर्वेदातील उपचार
उपयुक्त आहे. त्यावर विश्वास ठेवुन, त्याला वेळ देउन वयाला थांबविणे सहज शक्य आहे.
Nice article
ReplyDelete