सोरायसिस बरा झालेला एक पेशंटची पूर्ण केस हिस्टरी अशी आहे त्याचे नाव राजेश असुन वय ३५ ते ३७ असावे, मार्च २०१७ मध्ये उपचार सुरु केले पण दोन महिन्यानंतर परत आला. दोन महिन्यात थोडा रिकव्हर झाला होता परत तसाच होऊन आला. आयुर्वेद औषधी सोबत पथ्य आणि नियमित औषधी घ्यावी लागतात महत्व परत एकदा समजावून झाले त्याने पुर्ण अंगभर सोरायसिस आणि रोज १ बकेटभर flacky skin म्हणजे कोंड्यासारखी त्वचा निघते त्यामुळे नोकरी सोडून दिलेली होती. गावाकडे औरंगाबाद सोडून रहायला गेला होता त्यामुळे परत त्यालाच महत्व कळाले की आपण पथ्य पण नियमित औषधी घेणे फारच आवश्यक आहे. हा झाला रुग्णांना शास्त्राची व आजाराची माहिती पूर्ण नसल्याने होणारा अनियमितपणा व मग आजार बराच होत नाही ह्यावरच अडून राहणे.
सोरायसिस चे प्रकार सात आहेत त्यापैकी एक एकदमच होणारा इरॅथ्रोडर्मिक सोरायसिस जास्त प्रमाणात दिसत नाही. प्लक सोरायसिस , गुट्टाटे सोरायसिस , ईन्व्हर्स सोरायसिस, पस्चुलर सोरायसिस, सोरायटिक अर्थरायटिस त्यापैकी राजेश ला गुट्टाटे सोरायसिस आणि सोरायटिक आर्थराइटिस झालेला होता. हात वर उचलता येत नव्हता शोल्डर जॉईंट एकदमच जाम आणि मेटॅटॉर्सल जॉईन्टमध्ये प्रचंड दुखणे आणि लेफ्ट फुटवर सूज कायम असायची गुट्टाटे सोरायसिस संपूर्ण शरीरावर होता. चेहरा सोडला तर बोटभर जागा पण रिकामी नाही शिवाय भुक अजिबात लागत नाही खाज असल्याने झोप येत नाही .
आजुबाजुचे लोक डेड स्किन निघत असल्याने दूर बसायचे, हिन भावनेने बघायचे त्यामुळे रुग्ण कायम दुर्मुखलेला असायचा हसल्याने काळ्या पाण्याची शिक्षा होईल अशा पद्धतीने रडवलेला चेहरा अश्या अवस्थेत रुग्णाची परत दोन महिन्यानंतर ट्रीटमेंट सुरु झाली आयुर्वेदानुसार आम संचिती यकृताच्या कार्यात बिघाड म्हटल्यास आधुनिक शास्त्रानुसार फॅटी लिव्हर - लिव्हर फॅट डिपोझीशन होणे सामान्य भाषेत म्हणायचे झाल्यास आणि आरोग्य आहार, जंक फूड खाणे, व्यायाम, चालणे, फिरणे, काही न करता बसून राहणे आणि मी तर सारखा कामच करतो/ करते संपूर्ण शरीराला व्यायाम होणे आणि घाम येणे ह्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण उत्तम होऊन शरीरातील सर्व व्हायटल ऑर्गनचे कार्य उत्तम चालते ह्या लेखात जास्त आवर्जून का सांगावेसे वाटले कारण तुमचे शरीरचं आयुष्यभर तुम्हाला साथ देणार आहे तेव्हा त्याची काळजी घ्या आम्ही तर आजार बरा करण्यासाठी आहोतच.
आम संचिती - अन्नाचे पचन हि सर्वात महत्वाची आणि तितकीच गुंतागुंतीची क्रिया आहे. त्यामध्ये अन्न पचन, आहारातील मिनरल्स व्हिटॅमिन्स आतड्यांनी शोषून घेणे,बाहेर फेकून न देणे,मात्र त्या सोबत येणारे टॉक्झिन्स मल मूत्राद्वारे बाहेर टाकणे काही त्वचेद्वारे बाहेर टाकणे आणि ह्या क्रियेत अडथळा आल्यास शरीरातील विषद्रव्ये त्वचेपर्यंत यायला सुरुवात होते त्यामध्ये खुपच वेगवेगळी गुंतागुंत आहे प्रकार हि भरपूर आहे.
न्यूझीलंडच्या एका प्रसिद्ध वेबसाईट् नुसार त्वचारोगाचे साडेतीन हजार प्रकार आहेत. काही मध्ये इतके साधर्म्य आढळते कि त्यावर डायग्नोसिस करताना त्वचारोग तज्ञाचा गोंधळ उडू शकतो. आयुर्वेदाचा कुष्ठरोग या चरकसंहितेच्या ७ व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे महाकुष्ठ व क्षुद्रकुष्ट ह्यामध्ये त्वचारोगांचा अंतर्भाव दिसून येतो.
आम दोषामुळे सर्व स्रोतसामध्ये चिकट,बुळबुळीतपणा येऊन वायू व अग्नीचे कार्य बिघडते त्यामुळे एकतर हायपर फंक्शन ऑब्स्ट्रक्शन नाहीतर माल - फंक्शन दिसून येते त्यामुळे एक्झिमा सारखा सतत चिकट, ओलसर स्त्राव येणारा त्वचारोग ही होऊ शकतो किंवा एकदम त्वचेत कोरडेपणा वाढून कोंडा निघणारा आणि सारखी चार चार दिवसाला मृत त्वचा बाहेर फेकणारी सोरायसिस पण होऊ शकतो याशिवाय सोरायसिसची अनेक कारणे आहेत, हा मल्टीफॅक्टोरिअल डिसीज आहे.
राजेशच्या गुट्टाटे सोरायसिस विथ सोरायटीक अर्थरायटिस मध्ये आमसंचिती आणि वरील सर्व कारणांमुळे भूक तर नाहीच, त्वचारोग संपूर्ण शरीरावर पसरला स्किन हिल सेंटरला होणारी उपचार पद्धती पूर्णतः दोन्ही सायन्सचा विचार करून प्रत्येक सोरायसिस, व्हिटीलीगो चा प्रकारानुसार चिकित्सा केल्या जाते शिवाय पूर्ण इंटर्नल आणि एक्सटर्नल औषधी आयुर्वेदाचीच असल्याने रुग्णाला पूर्ण बरेच व्हायचे आहे हा एक विश्वास तयार होतो . त्यानंतर सतत सहा ते आठ महिने नियमित औषधी , एक्सटर्नल अप्लाय आणि आहारातील पथ्य अपथ्य पाळल्याने रुग्ण पुर्णतः बरा झालेला आहे त्याने आनंदाने फोटो शेअर करायला दिले आणि त्याची पूर्ण नॉर्मल त्वचा बघुन तो खूप आनंदी आहे. आयुर्वेदात ह्यावर अजून संशोधन सुरूच आहे आणि इंटरनॅशनल पातळीवर सोरायसिस व व्हिटीलीगो वरील उपचार व्हावे ह्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.
Comments
Post a Comment