प्रश्न कोड ह्या आजारात आहार कसा घेतला पाहिजे ?
उत्तर - कोड ह्या आजारात आंबट पदार्थ, दुधाचे पदार्थ पूर्णतः वर्ज्य केले पाहिजे. विरुद्धान्न अजिबात घ्यायला नको. विरुद्धान्नमध्ये ,दूध+ आंबट फळे, दूध+केळी, दूध+उडीद डाळ, दूध+मीठ, विरुद्ध रस एकत्र घेऊ नये. त्यामुळे कोड जास्त वाढू शकतो . शिवाय मांसाहारी रुग्णांनी मासे, अंडी, मांस पुर्णतः वर्ज्य करावे. क्लेद उत्पन्न करणारे पदार्थ वर्ज्य करावे. आहाराशी बऱ्याच गोष्टी निगडीत असतात. त्यामुळे आयुर्वेदात आहाराला खुप महत्व दिल्या गेलेले आहेत. शरीराचे पोषण संपुर्णतः आहारातुनच होत असते . आहार उत्तम असल्यास आजार दुर पळतात. हॉटेलचे पदार्थ बनविताना त्यात कृत्रिम रंग, अप्राकृतिक पदार्थ असल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तेव्हा ताजे व सकस पदार्थ मिळतील तिथेच हॉटेलिंग करावे. मिल्कशेक्स, आईस्क्रिम जेवणानंतर शक्यतो घेऊ नये. रात्री हलका आहार घ्यावा . रात्रीचे जेवण संध्या ७ते ८ च्या दरम्यान घ्यावे. रात्री लवकर झोपुन सकाळी लवकर उठावे. योगासने, चालणे, पोहणे, पाळणे, ह्यापैकी जो शक्य आहे तो व्यामाचा प्रकार करावा.
क्रमशः
Comments
Post a Comment