प्रश्न - कोडाचे रुग्ण कश्याप्रकारे आयुर्वेद उपचाराने बरे होतात, त्यापैकी त्रासदायक प्रकार कोणता?
उत्तर - कोडाच्या रुग्णांपैकी रुग्णाचा इतिहास घेतला जातो. त्यानुसार कोड किती लवकर बरा होऊ शकतो ,ह्यासाठी -
१. रुग्णाचे वय- ४ते ५ वर्षाच्या मुलांपासुन ६० वर्षापर्यंत कुठलाही रुग्ण आमच्या कडे येतो. त्यापैकी लहान मुले व तरुण लवकर उपचाराला प्रतिसाद देतात.
३. अनुवंशिकता - काही रुग्णाच्या फॅमिलीमध्ये हा आजार असतो. आजी, आजोबापैकी, आत्या, मामापैकी कुणाला असतो. तेव्हा ह्या रुग्णांना खुपच वेळ लागतो किंवा एक डाग बरा झाला की दुसरा तयार होतो.
४. रुग्णाची प्राकृत अवस्था किंवा इतर आजार - रुग्णाची शारीरिक क्षमता त्याला आपण फिटनेस म्हणु शकतो. तो उत्तम असल्यास रुग्णाचा त्वचारोग लवकर बरा होऊ शकतो. ह्याशिवाय रुग्णास इतर आजार असतील उदा. डायबिटीस, थायरॉईड, काही स्त्रियांना गायनिक डिसीज, सोरायसिस व कोड दोन्ही त्वचारोग एकत्र असणे ह्याप्रकारे रुग्णाला ठीक व्हायला वेळ लागतो.
क्रमशः
Comments
Post a Comment