आयुर्वेदमध्ये त्वचारोगवार यशस्वीरीत्या उपचार होतात. मग तो सोरायसिस असो की कोडासारखा आजार असो दीर्घकाल उपचाराने त्यावर इलाज होतो. कोडासारख्या आजाराला समाज विचित्र नजरेने बघत असल्यामुळे कोड झाला असे वाटल्यास लगेच रुग्णांची झोप उड़ते. रुग्णाचे टेंशन वाढते. त्याबद्द्ल सतत विचार करणे , मानसिक ताण घेणे हयातच रुग्ण गुरफटत जातो ह्यावर यशस्वी आयुर्वेद उपचार करणाऱ्या प्रसिद्ध सौंदर्यतज्ञ व त्वचारोगतज्ञ डॉ. सौ. नेहा डोणगावकर रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत .
उत्तर - रुग्णाला असे वाटणे अगदी साहजिकच आहे. कारण रुग्णाने भरपूर ठिकाणी उपचार घेतलेले असतात. त्यामध्ये त्याला म्हणावा तितकासा फरक पडलेला नसल्याने त्याची विचार करण्याची नकारात्मक प्रवृती झालेली असते. ह्यासाठी नियोजनबद्ध उपचार पद्धती, उत्तम मार्गदर्शन, आहारपद्धती ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी असतात. ह्या पद्धतीची उपचार पद्धती खूप कमी ठिकाणी दिल्या जाते. शिवाय रुग्णाचा सर्वात वीकपॉइंट म्हणजे सातत्य. ह्यामध्ये रुग्ण कमी पडतो. मला कोडमुक्त व्हायचे त्यासाठी मी सर्व प्रयत्न करेन हा ठामपणा रुग्णात असायला हवा.
क्रमश:
V.nice treatment ....keep it up
ReplyDeleteSuperb article from a great doctor
ReplyDeleteVery nice amazing
ReplyDeleteSuperb written Dr madam!! Very true... Consistency is very important.
ReplyDelete