प्रश्न - कोडावर आयुर्वेदातील उपचारपद्धती कशा प्रकारे काम करेल?
उत्तर- आयुर्वेदात सर्व त्वचारोगाचा अंतर्भाव हा पित्त दोष व रक्त धातु ह्यामध्ये होतो. पित्ताची सान्यावस्था बिघडली की तो रक्तधातूमध्ये दोष निर्माण करतो. रक्तातील उष्णता, अशुद्धता वाढली की अगदी पिंपल्सपासून सोरायसिस पर्यंतचे कुठलेही त्वचारोग शरीरात निर्माण होऊ शकतात. त्याची सम्प्राप्ती होऊ शकते. आता पित्ताचा खूप जवळचा संबंध आहाराशी आहे. तुम्ही कुठला आहार घेता, कधी घेता? ह्याला खूप महत्व आहे. सकाळी भरपूर तुपाची पुरणपोळी खाल्ली तर त्याचे पचन व्यवस्थित होते. पण तीच जर तुम्ही रात्री उशिराच्या जेवणात खाल्ली तर त्याचे पचन व्यवस्थित होणार नाही. अशा पद्धतीने सदोष आहाराचे सेवन केल्यास पित्त दूषित होऊन त्वचारोगाची सुरुवात होते. आपण त्याला ऍलर्जी म्हणतो. आहारातील काही विशिष्ट पदार्थाची ऍलर्जी ही जर पित्त दूषित नसेल तर होतच नाही. आयुर्वेद शास्त्र तुमच्या आजाराच्या उत्पत्तीपर्यंत जाते. आजाराचे मूळ कळाल्यावर उपचार परिपूर्ण होतात.
कोड ह्या त्वचारोगात पित्ताच्या दोषामुळे भ्राजक पित्त जे त्वचेला रंग देणाऱ्या पेशी आहेत मेलॅनिन त्याचा स्त्राव कमी होतो तो ह्या भ्राजक पित्तामुळे, शरीरावर हळूहळू पांढरट डाग दिसायला सुरुवात होते. ही प्रक्रिया एकदमच होत नाही. हळूहळू होत असते. अचानक डाग जरी दिसत असला तरी त्याची सम्प्राप्ती म्हणजे डाग तयार होण्याची प्रक्रिया शरीरात आधीच सुरु झालेली असते.
![Image result for ayurved images](https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSlM1PXgIeA8RzcO3eYKMtH2L1Gm09QXuvla_skliazn3-Q2yKD)
कोड ह्या त्वचारोगात पित्ताच्या दोषामुळे भ्राजक पित्त जे त्वचेला रंग देणाऱ्या पेशी आहेत मेलॅनिन त्याचा स्त्राव कमी होतो तो ह्या भ्राजक पित्तामुळे, शरीरावर हळूहळू पांढरट डाग दिसायला सुरुवात होते. ही प्रक्रिया एकदमच होत नाही. हळूहळू होत असते. अचानक डाग जरी दिसत असला तरी त्याची सम्प्राप्ती म्हणजे डाग तयार होण्याची प्रक्रिया शरीरात आधीच सुरु झालेली असते.
क्रमशः
Comments
Post a Comment