Psoriasis and Ayurveda
सोरायसिस आणि आयुर्वेद
सोरायसिस आणि आयुर्वेद हा एक चर्चिल्या जाणारा विषय आहे. सोरायसिस हा खुप चिवट त्वचारोग आहे. आयुर्वेदात ह्याची तुलना किटिभ कुष्ठ ह्या रोगाशी चरक संहितेत केली आहे. आधुनिक शास्त्रानुसार ऑटोइम्युन डिसीज असून तो खुप त्रासदायक समजल्या जातो. त्यासाठी स्टिरॉइड वापरून काही प्रमाणात आटोक्यात आणता येतो, पण त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होवू शकतात. शरीरातील व्हायटल ऑर्गन जसे की यकृत, किडनी ह्यावर त्याचा विपरीत परिणाम झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते.
आयुर्वेद हे एक परिपूर्ण शास्त्र आहे ज्यात तुमचा आहार-विहार, मानसिक आरोग्य ह्या सर्वांचा विचार करून चिकित्सा केल्या जाते. त्यानुसार रुग्णाचे आहार-संतुलन,मानसिक-संतुलन योग्य राखुन असे किचकट आजार बरे केल्या जातात.
आधुनिक शास्त्राचे उदाहरण घेतल्यास सोरायसिस चे सात प्रकार आहेत :
- प्लाक सोरायसिस
- गुट्टाटे सोरायसिस
- पसच्युलर सोरायसिस
- एरथ्रोडर्मिक सोरायसिस
- नेल सोरायसिस
- सोरायटिक ऑर्थरायटिस
- पालमोप्लांटर सोरायसिस
Comments
Post a Comment