प्रश्न – सौंदर्याची परिभाषा काय आहे असे तुम्हाला वाटते?
उत्तर – माझ्याकडे अनेक तरुण मुले मुली उपचारासाठी येतात. तेव्हा त्यांना सुंदर दिसायचे असते पण त्यासाठी आहार दिनचर्येत बदल हयागोष्टी रोज करण्याची तितकीशी तयारी दिसुन येत नाही. उदा. पिंपल्स व केसांच्या विकारावर उपचार पुर्ण झाल्यानंतर आयुर्वेदात अशा काही चिकित्सा आहेत त्यामुळे त्वचेचा वर्ण, पोत सुधारतो त्वचा अधिकाधिक तरुण दिसते. हयाची उपचार पध्दती व तिचा कालावधी साधरण तीन महिने किंवा सहा महिने असतो. हयानंतर सौदंर्य चिकित्सा पुर्ण होते त्यानंतर सौदंर्य अबाधीत रहावे हयासाठी आहार पध्दती योग्य असावी लागते.
आहारामध्ये सॅलड, फळे, भाज्या, पालेभाज्या मोड आलेले कडधान्ये, दुध हयाचा समावेश असावा. हयाचे नियोजन तक्ता बनवुन करता येईल. आठवडयातुन दोन दिवस मोड आलेली कडधान्ये, संध्याकाळी हिरव्या पालेभाज्या आहारात असेल तर सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल, राञीचा आहार हलका असल्याने पचनही उत्तम होईल दुपारच्या जेवणात सॅलड खाल्यानंतर जेवण केल्यास Limited food Intake घेतल्या जाईल व आहार नियंञित होईल, हया पध्दतीने आहार असावा.
सौंदर्याची परिभाषा तुमच्या व्यक्तिमत्वाशी सुध्दा निगडीत असते. आपण जिथे वावरतो त्या समाजात वावरतांना तुमच्या सौंदर्यासोबत, तुमचे व्यक्तिमत्व व आत्मविश्वास हयावर सुध्दा आकर्षक व्यक्तिमत्व अवलंबुन आहे. उदा – एखादी गोरीपान, लांबसडक केस असलेली तरुण मुलगी आहे पण उठुन बोलायला सुरुवात केल्यास चेहऱ्यावर दुर्मुखलेले भाव, आत्मविश्वासचा अभाव, रडका चेहरा असेल तर तिच्या सौंदर्याचा प्रभावही जाणवत नाही हयाउलट काळी सावळी चुणचुणीत हसऱ्या चेहऱ्याची मुलगी आपला प्रभाव पाडुन जाते. हयासाठी सौंदर्यासोबत बॉडी लॅग्वेंज उत्तम असावी लागते.
दिनचर्या तरुण मुलामुलीच्या, पुरुषांच्या खाण्या – पिण्याच्या, झोपण्याच्या वेळा नियमित नसतात व्यायामाचा अभाव, चालण्याचा व्यायामही हल्ली नको वाटतो. सायकलिंग, स्विमिंग, वॉकींग हयामधील जे शक्य आहे ते करावे. त्यामुळे शरीराला उत्तम बळ मिळते.
शिवाय “स्टॅमिना” ही आवश्यक बाब आहे. ही गोष्ट आजकाल दुर्लक्षिल्या जाते. कुठेही पार्टीला गेलात. १ तासभराने मेकअप व चेहरा दोन्ही उतरुन जातो. हयासोबत आपण दिवसभर ताजेतवाने असावे हयासाठी हया सर्व गोष्टी खुप महत्तवाच्या आहेत.
प्रश्न – हल्ली तरुण मुलींमध्ये वजन वाढणे, निस्तेज त्वचा, चेहऱ्यावर, अंगावर जास्त लव दिसुन येते हयाचे कारण काय?
उत्तर – मेडिकल, ईंजिनिअरींगच्या मुलींना शिवाय ईतरही विदयार्थ्यांना सतत बसुन अभ्यास करावा लागतो. टर्म, सेमिस्टर हया परिक्षा चालुच असतात. शिवाय ज्या मुली होस्टेल, बाहेरगावी राहतात त्यांना आहार व्यवस्थित मिळत नाही. हॉटेलचे खाणे, जंक फुड, भेळ, पाणीपुरी, पावभाजी,पिझ्झा हयावर तरुण पिढी ताव मारतांना दिसते पण त्याचे शरीरावर वाईट परिणाम दिसुन येतात. सध्या तरुण मुलीमध्ये खुप वाढत्या प्रमाणात दिसुन येणारा पॉलीसिस्टीक ओव्हरियन डिसीज (PCOD) हा आजार आहे. हयामध्ये ओव्हरीजनचा आकार वाढुन द्राक्षाच्या घोसा प्रमाणे होतो. त्यामुळे चेहऱ्यावर केस, हातापायावर केस, वजन वाढणे, त्वचा जाडसर दिसणे ही लक्षणे दिसुन येतात. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात जंक फुड विशेषत: पाणीपुरी सारखे पदार्थ जास्त प्रमाणातखाल्याने PCOD चे प्रमाण वाढत आहे. आयुर्वेद प्राचीन काळापासुन सांगत आलेले आहे त्याप्रमाणे आम्लरस, लवण रस, तिखट, एकञ खाउ नये, विरुध्दान्न घेउ नये हे आजच्या काळात परत एकदा सिध्द होतांना दिसुन येत आहे. म्हणुनच वारंवार माझ्या लिखाणात हाच संदेश असतो. आहाराकडे लक्ष दया. तुमचे शरीर आहारावरच अवलंबुन आहे. शरीरावर अन्याय करु नका.
प्रश्न – चाळीशीतील महिलांसाठी होणाऱ्या त्वचारोगावर चिकित्सा व सौंदर्य चिकित्सा कश्याप्रकारे केल्या जाते?
उत्तर – चाळीशीतील महिलांच्या आयुष्यातला हा एक महत्तवाचा टप्पा आहे. चाळीशीनंतर महिला व पुरुष दोघांचाही सेकंड ईनिंग सुरु होते. मुले मोठी व्हायला लागतात त्याचे स्वत:चे विश्व तयार होते. महिलांमध्ये त्यामुळे ऐकटेपणा व रजोनिवृत्तीच्या पुर्वीचा काळ सुरु होतो. हया वयात महिलांना चेहऱ्यावर वांग, निस्तेज व कोरडी त्वचा, कोरडया त्वचेमुळे होणारे त्वचारोग, ऍलर्जी हयासारख्या समस्या व त्वचारोग दिसुन येतात. शिवाय केस गळणे, निस्तेज होणे समोरचे केस गळुन हेअर-लाईन मागे जाणे हयामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते. हयावर आयुर्वेदात उत्तम चिकित्सा केल्या जाते. आयुर्वेदामध्ये हार्मोन्सचे प्रमाण कमी होउ लागल्याने येणाऱ्या समस्या नियंञित करण्यासाठी नॅचरल हर्बलयुक्त उत्तम औषधी आहे. उदा, अशोक, लोध्र, शतावरी, अश्वगंधा, अर्जुन हयांच्या पासुन बनविलेल्या औषधाने, सौदंर्याच्या समस्या नाहीश्या होउन त्वचा परत तरुण व सुंदर दिसु लागते. हे अशक्य नसुन खरे आहे. हयार उपचार कालावधी सहा महिन्याचा असतो आपण परत सुंदर दिसायला लागलो ही खरच आनंददायी कल्पना आहे. आणि आयुर्वेदातील उपचाराने कुठलेही साईड ईफेक्टस न होता सहज शक्य आहे. शिवाय त्वचेचा वर्ण काळवंडला असेल तर उजळ होण्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपचार आहे. शिवाय उपचाराला आहाराची जोड दिल्यास सौदंर्य टिकुन राहते. फेशिअल, ब्लिचिंगसारख्या पार्लर प्रोसिजरप्रमाणे तातपुरते ईफेक्टस नसतात तर कायमस्वरुपी उपचार केल्या जातात.
Comments
Post a Comment