कोडाचे उपचार दिर्घकाळ का घ्यावे लागतात?

Image result for vitiligo patient in depressed

       त्वचारोगाचे उपचार करताना त्वचारोगतज्ञाला कालावधी रुग्णाकडुन विचारल्या जातो. प्रथम कुठलाही त्वचारोग हा टायफाईड, मलेरिया, कुठल्याही ईन्फेक्शन मुले होणारे आजार ह्यासारखा नसतो कि ८-१० दिवसात नॉर्मल होऊन जाईल. श्वसनाचे आजार डायरीया, युरिन ईन्फेक्शन हयासारखी विकार किंवा ईतर विकारासाखे त्वचारोग नसतात. काही फंगल इन्फेक्शन्स उदा- खरुज हयासारखे तर ईतर त्वचारोगाला बरे व्हायला वेळच लागतो. हयाबददल  प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे :-

प्रश्न- कोडासारख्या त्वचारोगाचे रुग्णाबददल तुमचा काय अनुभव आहे?
उत्तर- कोड झाल्यामुळे रुग्ण भयभित झालेला असतो. कोड जास्त वाढला, दर्शनी भागावर आला तर कसा विद्रुप चेहरा किंवा विद्रुप शरीर दिसेल, सौंदर्य नष्ट होईल ही भीती रुग्णाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसुन येते. शिवाय बरा होईल की नाही इथेच खरा समजुन घेण्याचा प्रश्न रुग्णामध्ये कमी प्रमाणात दिसनु येतो. हा त्वचारोग असाध्य नाही पण त्याला पथ्य पाळण्याची व दिर्घकाळ म्हणजे वर्षानुवर्षे नव्हे तर सहा महिने, एक वर्ष,दिड वर्षे असा कालावधी लागतो. डागावर फरक प्रथम महिन्यापासुनच पडायला लागतो. रंगद्रव्याची कमतरता शरीरात निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये बदल घडवुन आणणे ही फार किचकट प्रक्रिया असते. त्यासाठी प्रत्येकाच्या शरीराची उपचाराला प्रतिसाद देण्याची शक्ती ही वेगवेगळी असु शकते त्यामुळे कालावधीत सुध्दा फरक पडु शकतो. त्याचप्रमाणे वेळ लागु शकतो रुग्ण लगेच प्रश्न विचारतात त्या आजीचे 1 वर्षात ईतके मोठे डाग कमी झाले  आमचे तर छोटेच आहे, आम्हाला वेळ का लागतो, शरीराच्या उपचाराला गणिताच्या भाषेत उत्तर देता येत नाही २+२ = ४  इथे होत नसतात. शरीराचे गणित काही वेगळेच असते. आपण ओळखुन डॉक्टरांच्या प्रयत्नाला साथ द्यायची  असते.

प्रश्न-दिर्घकालीन उपचाराबददल तुमचा काय अनुभव आहे?
उत्तर- रुग्णाने त्याची मानसिकता सकारात्मक ठेवली तर फार लवकर उपचार संपतात हा माझा अनुभव आहे. आजीची मानसिकता व डॉक्टरांवरचा विश्वास हयामुळे त्या लवकर बऱ्या झाल्या. पथ्य पाळणे फार आवश्यक आहे. रुग्णाच्या आहाराला कुठेही रंगद्रव्याला वाढविण्यासाठी चाललेल्या औषधी उपचाराला सप्रेस करणारा घटक नको असतो. शिवाय काही फॅक्टर असे आहेत ज्यामुळे उपचाराला वेळ लागतो.
1) अनुवंशिकता
2) जुनाट कोड, दहा वर्षापेक्षा जुने
3) रुग्णाचे वय
4) शरीराच्या किती टक्के भागावर कोड आहे.
अनुवंशिकता असलेलल्या रुग्णाचा आटोक्यात आलेला कोड पुन्हा पुन्हा वाढण्याचा प्रकार बऱ्याचदा दिसुन येतो. कोडाचा आधुनिक शास्ञानुसार ऍटो ईम्युन ‍डीसीज म्हटल्या जातो त्यामुळे साधारणत: आयर्वेद व आधुनिक शास्ञाच्या हया त्वचारोगाबददल मतभिन्नता दिसुन येते.
दोन्ही पॅथीच्या मुळ उपचार पध्दतीमध्ये भिन्नता असल्याने मते वेगवेगळी असणारच. जुनाट कोड, खुप वर्षापासुन असेल व सारखे वाढत असेल तर त्याला बरे व्हायला वेळ लागतो. रुग्णाच्या वयावर पण कोड बरे होण्याचा कालावधी अवलंबुन असतो.

प्रश्न- हल्ली आहाराचे खुप प्रस्थ वाढत आहे ? असे का?

उत्तर- आपल्या शरीराच्या पोषणासाठी 100% आहार महत्तवाचा असतो. आहारसातुन रस, रक्त, मांस, अस्थि, मेद, मज्जा व शुक्र हया सप्त  धातुचे पोषण होते. ईतका  महत्तवाचा आहार असतो. मग एखादा रोग झाल्यावर त्यावर पथ्य व अपथ्य असे दोन भाग आहाराचे पडतात. त्या आजारातुन लवकर बरे व्हावे हयासाठी घ्यायचा आहार म्हणजे-
हितकर आहार- कोडाच्या रुग्णाने मोड आलेले कडधान्यापैकी चने,बीटरुट, ओळे अंजीर,हिरव्या पालेभाज्या बी जीवनसत्व युक्त आहाराचे सेवन केले पाहिजे.  शिवाय जेवणाच्या वेळी नियमित असल्या पाहिजे.पित्ताच्या विकृतीमुळे उपचारात बाधा येउ शकते. त्यासाठी बध्दकोष्ठता होउ नये हयाची पण काळजी घेतली पाहिजे.हयासाठी आहार हा अत्यावश्यक भाग आहे.

अहितकर आहार- कोडाच्या त्वचारोगात आंबट पदार्थ एकदम वर्ज्य मानल्या जातात. शिवाय दुधाचे पदार्थ, दही, ताक, लिंबु, चिंच, कैरी, खारवलेले, आंबवलेले पदार्थ, खारट पदार्थ, पनीर, शिळे अन्न, लोणची, पापड, दही मासे, तिळ हयासारखे अभिष्यंदी पदार्थ एकदम वर्ज्य करावे लागतात. नॉनव्हेज वर्ज्य करावे लागतात त्यामुळे कोड बरा होण्यास जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आयुर्वेदात आहाराचे खुप महत्तव आहे.

प्रश्न- रुग्णाच्या मानसिकतेबददल आयुर्वेदात काय उपचार आहे?
उत्तर- आयुर्वेदात रुग्ण पुर्णपणे नकारात्मकता घेउन आलेला असतो. प्रथम समुपदेशन करणे अत्यावश्यक आहे. नंबर हळुहळु उपचारामुळे कोड जसजसा बरा होउ लागतो तसतसी रुग्णाची सकारात्मकता वाढायला लागते. माञ वारंवार सयमुपदेशन करणे हा उपचाराचा अत्यावश्यक भाग आहे. शिवाय रुग्णाची शारिरीक अमतेकडे सुध्दा लक्ष दयावे लागते. मानसिक व शारिरीक आरोग्य उत्तम ठेवावे लागते. ऍनिमिया, उपचाराने पुर्णत: आटोक्यात असलेला थॉयराईड, डायबेटीस, ईतर त्याशी संबंधीत असलेल्या आजाराची पण  काळजी घ्यावी लागते.
मी उपचार करत असलेला सर्वात किचकट आजार कोड आहे.जिथे रुग्णाची सकारात्मकता पुर्ण संपलेली असते त्यातुन त्याला बाहेर काढुन पुर्णत: उपचार पध्दतीत समजवुन बसविणे आणि त्यानंतर यशस्वी उपचार करणे. फार काळजीपुर्वक उपचार करावे लागतात. आई वडील मुलांना संभाळतात तसे रुग्णाला सांभाळावे लागते. त्यातुन चमत्कारासारखे परिणाम दिसुन येते. रुग्णाचे मन व शरीर दोन्ही ठीक करावे लागते तेव्हाच उपचार परिपुर्ण होतात. म्हणुनच कोड हा दिर्घकालीन उपचार आहे त्यासाठी रुग्णाने प्रथमच मानसिक तयारी करुन उपचाराला सुरुवात केल्यास रुग्ण नक्कीच बरा होउ शकतो. रुग्ण व डॉक्टरांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे.


Comments

Popular posts from this blog

Winter Skin Conditions of Psoriasis and Ichthyosis