Posts

Showing posts from August, 2018
Image
रक्तदोष ? (रक्तविकार) मनुष्याच्या शरीरातील रक्त हा अतिशय महत्तवाचा घटक आहे . मनुष्याच्या सर्व शरीरभर रक्ता ‍ भिसरण होत असते . काही अंतर्गत शरीरातील घडामोडीमुळे हया शुध्द रक्तामध्ये बदल घडुन अशुध्दता निर्माण होते . त्यातुन रक्त विकार तयार होतात .     आयुर्वेदात वात , पित्त , कफ हे तीन दोष आहेत . काही आचर्यानी रक्तालाही दोष मानलेला आहे . रक्त हा रस , रक्त , मांस , मेद , अस्थी , मज्जा व शुक्र हया सप्तधातुंपैकी एक धातु होय . रक्त धातु जेव्हा दुषीत होतो तेव्हा दुसऱ्या धातुंना विकृत करतो , तसेच दुसऱ्या दोषामुळे विकृत होतो तेव्हा अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतो . त्यापैक काही रोगांबदद्ल माहिती घेवू या .     रक्तविकारामध्ये “ कुष्ठ ” हा व्याधी प्रामुख्याने मोडते . हया शिवाय विसर्प , रक्तपित्त , विद्रधी , प्रदर , वातरक्त , त्वचा वैवर्ण्य ( पुर्ण शरीरांच्या त्वचेमध्ये कोरडेपणा येणे ) तृष्णा , ( सारखी तहान लागणे ), दाह ज्वर , शिर : शुल , उदरदाह , अशक्तपणा , अनिद्रा , अतिनिद्रा ...