![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZlyBN6resUU30VisndxkgCqdhQob6nUJQpSmlAYF8l0ukf07FcDjA3U5BhK6UXN1AWXthf0WGOYMTFvaSs4Tkm_Kg9QF058Ec8fE2oxN1aMHGtOgm3eulJaTmw1nhByBzVtMMruWjfNk/s200/IMG-20180712-WA0017.jpg)
सोरायसिस ऑफ बाय आयुर्वेद सोरायसिस म्हटले की माझ्यासमोर बसलेला पेशंट, प्रचंड तणावाखाली असलेला चेहरा, चेहऱ्यावर भिती, नर्व्हसनेस आणि आता हा माझा आयुष्याचा सोबती आहे ही भावना खरतर सोरायसिसचा खुपच बाऊ करून ठेवलाय असं म्हणायला हरकत नाही. बर पेशंट नुस्ती काळजीच करणार,अरे बाबा पोट कुठे चाललय , फॅटी लिव्हर आहे, व्यसन सोडावं लागेल म्हटल्यावर व्यायाम आणि मी , नाही जमणार खूप बिझी असतो,ऑफिसर आहे, मी आणि व्यायाम मला तर मुलांचा डब्बा नवऱ्याचा डब्बा , सकाळी जमणारच नाही अशी अनेक कारणे कानावर आदळतात असो. सोरायसिस बरा झालेला एक पेशंटची पूर्ण केस हिस्टरी अशी आहे त्याचे नाव राजेश असुन वय ३५ ते ३७ असावे, मार्च २०१७ मध्ये उपचार सुरु केले पण दोन महिन्यानंतर परत आला. दोन महिन्यात थोडा रिकव्हर झाला होता परत तसाच होऊन आला. आयुर्वेद औषधी सोबत पथ्य आणि नियमित औषधी घ्यावी लागतात महत्व परत एकदा समजावून झाले त्याने पुर्ण अंगभर सोरायसिस आणि रोज १ बकेटभर flacky skin म्हणजे कोंड्यासारखी त्वचा निघते त्यामुळे नोकरी सोडून दिलेली होती. गावाकडे औरंगाब...