का नाकारल्या जातो कोड? अनेक प्रकारचे आजार दिसुन येतात. कॅन्सरपासुन सर्दीपर्यंत पण कोड झाल्यावर कुणीही डिप्रेस का होतो. रुग्ण अनुभव सांगताना म्हणतात आम्ही खुप ठिकाणी फिरलो सगळे म्हणतात घेउन पहा औषधी आम्ही सांगु नाही शकत. मग तर आम्ही गळुनच गेला काय करावे ताई, बघा ना तरुण मुलगी काय आणि मुलगा काय तापच ना हो डोक्याला. गेल्या २०-२२ वर्षाचा कोडाच्या रुग्णासोबत चा एक डॉक्टर म्हणुन केलेल्या प्रवासाचा आढावा घेतला तर रुग्ण वर्षानुवर्षे गोंधळातच जगतो. नेमके काय करावे, कुठली ट्रिटमेंट चालू ठेवावी, ही तर स्लो आहे मग ती दुसरी फास्ट होईल का, मग त्याने तिकडे जा म्हटले हयाने ईकडे जा म्हटले मग नेमके काय करावे मग सारखे डॉक्टर व ट्रिटमेंट बदलण्याचे काम सुरु होते. काही प्रमाणात स्लो, काही प्रमाणात बरे असा प्रवास आयुष्यभर चालु राहतो मग प्रचंड नैराश्य, ताण व हया आजाराच काय खर आहे. जाउ दया मग- परत वाढु लागला की घाबरुन डॉक्टर गाठायचा आणि परत सुरु करायचे असा हा प्रवास. कोड होण्याची कारणे – आयुर्वेदानुसार कोड होण्याची कारणे प्रामुख्याने 1) आहार, ...