त्वचारोगाचे वाढते प्रमाण - चिंताजनक

       त्वचारोगाचे आजच्या काळात प्रमाण वाढतच चालले आहे. त्वचारोगामध्ये कुठल्याही शहराचे वातावरण ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो त्याचा खुप जवळचा संबंध आहे. जसे कि औरंगाबादला पोल्युशन खूप जास्त आहे. दिल्लीला तर खूपच जास्त आहे त्यामुळे फंगल इन्फेक्शन खुप जास्त प्रमाणात आणि परत परत होत राहते. त्याशिवाय आपली जीवनशैली क्वालिटी ऑफ लिव्हिंग म्हणजे धूळ, धूर, घरातील स्वच्छता, मोकळी हवा आपल्या ह्यापैकी किती प्रमाणात क्लिन एन्व्हायरमेंट मिळते त्यावर आपल्या त्वचेचे आरोग्य अवलंबुन असते. Allergy म्हणजे शरीराकडुन ह्याला होणार विरोध, रिऍक्शन म्हणजे  दिसणारे परिणाम होय. ऍलर्जी नेमकी कशाची आहे हे टेस्ट केल्यावरच समजू शकते. 
त्वचेवर येणारी खाज- कुठल्याही त्वचारोगात खाज म्हणजे त्वचेवरील इन्फ्लमेशन उदा.एक्झीमा न्यूरालॉजीकल, सायकोजेनिक, न्यूरोपॅथीक, अशी वेगवेगळ्या कारणांनी असू शकते ह्या कॅटेगरीमध्ये ऍनाटामीकल , पॅथालॉजीकल, आणि सायकॉलॉजीकल फॅक्टर जबाबदार असू शकतात. 

  1. न्यूरोजेनिक- न्यूलर  पॅथालॉजीच्या शिवाय सेंट्रल नर्व्हस सिस्टीमचा रिस्पॉन्स म्हणून खाज येते. 
  2. सायकोजेनिक - सायकॉलॉजिकल डिसऑर्डरमुळे 
  3. न्यूरोपॅथिक - न्यूरोनल पॅथालॉजीसोबत वेगळ्या कारणाचे  रिझल्ट म्हणून खाज येते.  
  4. न्यूरोसेप्टीव्ह   - त्वचेवरील सूज आणि डोळ्यांनी दिसून येणारे त्वचेवरील बदल, हि जास्त सामान्य आहे. ह्याचा खोलात जाऊन अभ्यास केल्यास खूप आजारात खाज येते असे दिसते, . जसे की कावीळ झाल्यावर पण खाज येते. पण आपण त्वचारोगाची संबंधित विचार केल्यास खाज हा शरीराचा येणाऱ्या त्वचारोगा संबंधित  ईशारा असतो मग तो ऍलर्जिक असो, सोरायसिस असो किंवा एक्झीमा असो. सध्या दिसून येतात. 
जास्त प्रमाणात दिसून येणारे त्वचारोग 
१).  एक्झीमा - ह्या त्वचारोगात, त्वचा लाल, सुजलेली, रफ, क्रॅक पडलेली दिसुन येते. एक्झीमा जेनेटिक,एन्व्हायरमेंट, किंवा पॉलनमुळे ट्रिगर होऊ शकतो. ह्यामध्ये त्वचा खूप कोरडी आणि सेन्सिटिव्ह होते. त्यात पाळीव प्राण्यांमुळे, डिटर्जंट, साबण ज्याचा खुप स्ट्रॉंग सुवास आहे, परफ्यूम्स ह्यामुळे एक्झीमा वाढु शकतो. लहान मुलांमध्ये एक्झिमा जास्त दिसुन येतो. खाज खूप असते. ऍलर्जीला खूप रिस्पॉन्स असतो. त्यामुळे अजून वाढणे, कमी होणे चालूच असते.

२).  सोरायसिस - हा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येणारा  त्वचारोग आहे. शास्त्रज्ञांच्या मते इम्युन सिस्टीम ओव्हर ऍक्टिव्ह झाल्याने सोरायसिस होतो.  अनेक कारणे ह्याच्याशी संबंधित आहे. थंडीच्या दिवसात सोरायसिस खूपच वाढतो. मलेरिया, हायपर टेंशनवरील का बिटा ब्लॉकर मेडीसीन ने वाढण्याची शक्यता आणि शरीरातील ईतर ईन्फेक्शन मुळे वाढण्याची शक्यता असते. टॉन्सीलायटिस् स्ट्रेफ्ट्रोकोकल  ईन्फेक्शनमुळे गुट्टाटे  सोरायसिस वाढु शकतो, होउ शकतो, ज्यांना  अल्कोहोल ड्रिंक्स ची सवय असते त्यांचा सोरायसिस वाढु शकतो. स्मोकिंग ने सुध्दा वाढु शकतो.‍

३)अर्टिकेरिया हा सर्वात जास्त दिसुन येतो. काही फुड्स, मेडिसिन ईन्फेक्शन, ईन्सेक्ट बाईट किंवा ईंटरनल आजार हयामुळे दिसुन येतो. नटस् चॉकलेट, फिश, टोमॅटो, एग्ज, दुध, फ्रेश बेरीज, फरमेन्टेड फुड, जंक फुड हयामुळे दिसुन येतो अर्टिफिशियल कलर, प्रिर्झव्हेटिव्ह, स्ट्रेस हयामुळे वाढतो. सहा आठवडे ते वर्षानुवर्ष चालणारा हा त्वचारोग आहे. थंडीच्या काळात जास्त वाढतो. गरम पाणी, थंड पाणी, एक्झरसाईज, सन एक्सपोझर, बॅक्टेरियल ईन्फेक्शन, स्ट्रेप आहे, युरिनरी ईन्फेक्शन यामुळे दिसून येतो.

४).  पांढरे डाग (कोड) – सर्वात जास्त ञासदायक हयात खाज येत नाही पण समाजात रुग्णाला चार लोकांमध्ये न्युनगंड आणणारा हा आजार आहे. गेल्या २५ वर्षापासुन विविध रुग्ण कोडाचे हाताळल्या गेले त्यानुसार प्रत्येक रुग्णाचा ईतिहास वेगवेगळा असतो. आतापर्यंत ३५०००रुग्णाचा डाटा तयार झालाय. बऱ्याचश्या रुग्णात नकारात्मकता ईतकी दिसुन येते की आमच काही खरच नाही. संपुर्ण पथ्य, नियमितता पाळणारी रुग्णांची संख्या कमीच आहे. त्यातमध्ये कॅटेगरीनुसार हेरेडिटरी, थॉयराईडमुळे, डायबिटस मुळे, मेनॉपॉझनंतर, अचानक खुप स्ट्रेस आल्यानंतर, ही चार जास्त कॉमन कारणे  आहेत. शिवाय खेडयांपाडयातुन येणारी छोटी मुले  विशेष:त मुलींमध्ये मालनरिशमेंट(कुपोषित ), ऍनिमिया जास्त दिसुन येतो. कोडाचा आजार ओठावर असो, हाडावर असो वेळ घेतो पण आयुर्वेदातील उपचाराने रुग्णाला दिलासा मिळतो. त्यासाठी त्वचारोग झाल्याबरोबर लगेच आयुर्वेदाकडे वळल्यास उत्तमच  त्यासाठी वर्षभर उपचार घेण्याची मानसिकता हवी. तसेच सोरायसिस, एक्झीमा  ह्यासाठी  उपचार पथ्यासहीत वर्षभर करावेच लागतात आजार त्याची संप्राप्ती, त्याचा आहार त्याची पचनक्षमता, यकृताची कार्यक्षमता हया सर्व गोष्टीचा विचार करुन चिकित्सा उत्तम केल्या जातत. 

Comments

Popular posts from this blog

Winter Skin Conditions of Psoriasis and Ichthyosis